IND vs BAN: विराटच्या निशाण्यावर मोठा रेकॉर्ड, दोघांना मागे टाकण्याची संधी

India vs Bangladesh Test Series: टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली 9 महिन्यांनी कसोटी संघात कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. विराटला पहिल्याच सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

IND vs BAN: विराटच्या निशाण्यावर मोठा रेकॉर्ड, दोघांना मागे टाकण्याची संधी
virat kohli test cricket
Image Credit source: virat kohli x account
| Updated on: Sep 09, 2024 | 11:42 PM

टीम इंडिया अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आता बांगलादेश विरुद्ध मायदेशात कसोटी आणि टी 20I मालिका खेळणार आहे. उभयसंघात 2 सामन्यांची कसोटी आणि 3 सामन्यांची टी 20I सीरिज खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआय निवड समितीने पहिल्या कसोटी सामन्यासाठी 8 सप्टेंबर रोजी भारतीय संघाची घोषणा केली. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. उभयसंघातील पहिला कसोटी सामना हा 19 सप्टेंबरपासून चेन्नईतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे. या मालिकेत विराट कोहली याच्याकडे मोठा विक्रम ब्रेक करण्याची संधी आहे.

बांगलादेश विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम हा सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 7 सामन्यांमधील 9 डावात 820 धावा केल्या आहेत. राहुल द्रविड दुसऱ्या स्थानी आहे. द्रविडने 7 सामन्यांमधील 10 डावात 560 धावा केल्या आहेत. चेतेश्वर पुजारा तिसऱ्या स्थानी आहे. पुजाराने 5 सामन्यांमधील 8 डावात 468 धावा केल्यात. विराटला पुजाराचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. विराटला त्यासाठी फक्त 32 धावांची गरज आहे. तसेच विराटला द्रविडला मागे टाकण्यासाठी 124 धावांची गरज आहे. विराटने 124 धावा केल्यास तो बांगलादेश विरुद्ध सर्वाधिक धावा करणारा दुसरा भारतीय ठरेल.

विराटला दोन्ही सामन्यात संधी!

दरम्यान बीसीसीआय निवड समितीने पहिल्याच सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. मात्र विराटला दुसऱ्या सामन्यातही संधी मिळू शकते. आता विराट खेळला तर एकाच डावात तो पुजारासह राहुल द्रविडलाही मागे टाकेल. तसं झालं नाही, तर चाहत्यांना दुसऱ्या कसोटी सामन्याची प्रतिक्षा पाहावा लागेल. मात्र विराटने बांगलादेश विरूद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात शतक करुन हा विक्रम आपल्या नावावर करावा, अशी आशा त्याच्या चाहत्यांना असणार आहे.

पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया

बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.