
इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी 20I मालिकेला 22 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना हा कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. मात्र पाहुण्या इंग्लंडने सामन्याच्या 24 तासांआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर करत आपण सज्ज असल्याचं दाखवून दिलं आहे. इंग्लंड क्रिकेटने आपल्या प्लेइंग ईलेव्हनमधील खेळाडूंची नावं एक्स या सोशल मीडिया हॅन्डलवरुन जाहीर केली आहेत. जॉस बटलर इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे.
टीम इंडियाचं या मालिकेत सूर्यकुमार यादव नेतृत्व करणार आहे. तर जोस बटलर इंग्लंडची धुरा सांभाळणार आहे. बटलरने या सामन्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. या सामन्यात विकेटकीपर फिल सॉल्ट बेन डकेट याच्यासह ओपनिंग करणार आहे. तर कर्णधार जोस बटलर तिसऱ्या स्थानी बॅटिंगला येणार आहे. जोसने दुखापतीतून सावरल्यापासून विकेटकीपिंग केली नाहीय.
वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड या दोघांचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. वूडला मायदेशात श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत दुखापत झाली होती. त्यामुळे वूड टीममधून बाहेर होता. मात्र आता त्याचं कमबॅक झालं आहे. तर दुसऱ्या बाजूला हॅरी ब्रूक हा उपकर्णधार असणार आहे. तसेच लियाम लिविंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन आणि गस एटकीन्सन या अष्टपैलू खेळाडूंचा अंतिम 11 मध्ये समावेश आहे. तसेच फिरकी गोलंदाजीची जबाबदारी आदिल रशीद याच्यावर असणार आहे.
इंग्लंडची पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन
Firepower with bat and ball 💥
Brendon McCullum has named the first white-ball team of his reign for tomorrow’s opening IT20 v India 💪 pic.twitter.com/DSFdaWVPrB
— England Cricket (@englandcricket) January 21, 2025
पहिल्या टी 20i सामन्यासाठी इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जॉस बटलर (कर्णधार), फिल सॉल्ट, बेन डकेट, हॅरी ब्रूक, लियाम लिविंगस्टोन, जेकब बेथल, जेमी ओव्हरटन, गस एटकीन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.
इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि वॉशिंगटन सुंदर.