IND vs ENG : भारतीय क्रिकेट इतिहासातील भारताचा सर्वात वाईट दिवस, पहिल्यांदाच असं काही घडलं

भारताने विजयासाठी दिलेल्या 371 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात इंग्लंडने जबरदस्त खेळी केली. इंग्लंडच्या बेन डकेट आणि जॅक क्राउली यांनी इतिहास रचला आहे. या दोघांनी काही विक्रम आपल्या नावावर केलं. तसेच भारताच्या नावावर नकोसा विक्रम रचला गेला आहे.

IND vs ENG : भारतीय क्रिकेट इतिहासातील भारताचा सर्वात वाईट दिवस, पहिल्यांदाच असं काही घडलं
IND vs ENG : भारतीय क्रिकेट इतिहासातील भारताचा सर्वात वाईट दिवस, पहिल्यांदाच असं काही
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 24, 2025 | 9:15 PM

इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने सुमार कामगिरी केल्याचं स्पष्ट दिसत आहे. दोन्ही डावात धावांचा डोंगर रचूनही काही खास करता आलं नाही असंच म्हणावं लागेल. दुसऱ्या डावात भारताने 371 धावांचं लक्ष्य इंग्लंडसमोर ठेवलं. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने दमदार सुरुवात केली. बेन डकेट आणि जॅक क्राऊली यांनी सलामीला येत अनेक विक्रम आपल्या नावावर केले. या दोघांनी भारताविरुद्ध चौथ्या डावात सर्वात मोठी भागीदारी केली. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी 188 धावांची भागीदारी केली. यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या एलन रे आणि जॅफ्रे स्टॉलमेयरच्या नावावर होता. या दोन्ही खेळाडूंनी 1953 मध्ये भारताविरुद्ध चौथ्या डावात पहिल्या विकेटसाठी नाबाद 143 धावा केल्या होत्या. आता हा विक्रम इंग्लंडच्या नावावर गेला आहे. इतकंच काय तर इंग्लंडला विजयाच्या वेशीवर आणून सोडलं आहे.

बेन डकेट आणि जॅक क्राऊली यांनी कसोटीत 2022 नंतर सर्वाधिक शतकी भागीदारी करण्याचा विक्रम रचला आहे. अशा कामगिरी या दोघांनी चार वेळा गेली आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर चार जोड्या आहेत. यात पाकिस्तानचा अब्दुल्ला शफीक आणि इमाम उल हक, न्यूझीलंडचा डेवॉन कॉनवे आणि टॉम लॅथम, भारताचा यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा आणि डेविड वॉर्नर आहेत. या य जोडींच्या नावावर प्रत्येकी तीन शतकी भागीदारी आहेत. बेन डकेट आणि जॅक क्राऊली यांच्या भागीदारीमुळे भारतापासून दूर गेला.

बेन डकेटने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने डिसेंबर 2022 नंतर 18व्यांदा 50हून अधिक धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीला येत सर्वाधिक 50 धावा करण्याचा विक्रम केला आहे. इतकंच नाही तर बेन डकेट आणि जॅक क्राउली या जोडीने सहा वेळा भारताविरुद्ध 50 हून अधिक धावांची भागीदारी केली आहे. चौथ्या डावात जॅक क्राउलीने 126 चेंडूत 7 चौकार मारत 65 धावा, तर बेन डकेटने 170 चेंडूत 21 चौकार आणि एक षटकार मारत 149 धावा केल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us