
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. दुसरा आणि निर्णायक सामना हा 9 फेब्रुवारीला कटकमधील बाराबती स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजता टॉस झाला. इंग्लंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कर्णधार जोस बटलर याने पुन्हा एकदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे इंग्लंडसाठी हा ‘करो या मरो’ असा सामना आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची संध आहे. त्यामुळे या दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघात चुरस पाहायला मिळू शकते.
दुसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघांकडून एकूण 5 बदल करण्यात आले आहेत. इंग्लंडने 3 तर टीम इंडियाने 2 बदल केले आहेत. विराट कोहली याचं गुडघ्याच्या दुखापतीनंतर संघात कमबॅक झालं आहे. त्यामुळे यशस्वी जयस्वाल याला बाहेर बसावं लागलं आहे. तर कुलदीप यादव याच्या जागी फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याचा संधी देण्यात आली आहे.वरुण यासह टीम इंडियाकडून एकदिवसीय पदार्पण करणारा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. तर इंग्लंडकडून मार्क वूड, गस एटकीन्सन आमि जेमी ओव्हरटन या तिघांचा समावेश करण्यात आला आहे.
वरुण चक्रवर्ती यांचं एकदिवसीय पदार्पण
Debut 🧢 ✅
Varun Chakaravarthy will make his first appearance for #TeamIndia in an ODI ✨
Updates ▶️ https://t.co/NReW1eEQtF#INDvENG | @IDFCFIRSTBank | @chakaravarthy29 pic.twitter.com/TRah0L7gh9
— BCCI (@BCCI) February 9, 2025
दरम्यान वरुण या मालिकेतून एकदिवसीय पदार्पण करणारा टीम इंडियाचा तिसरा खेळाडू ठरला आहे. याआधी पहिल्या सामन्यातून यशस्वी जयस्वाल आणि हर्षित राणा या दोघांनी पदार्पण केलं होतं.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, गस अॅटकिन्सन, आदिल रशीद, मार्क वूड आणि साकिब महमूद.