New Insurance Bill 2025: सर्वांचा विमा, सर्वांची सुरक्षा, नवीन विमा बिलाचा तुम्हाला काय फायदा, एका क्लिकवर जाणून घ्या
New Insurance Bill 2025: सरकारने विमा क्षेत्रात क्रांती घडवण्याचा निश्चिय केला आहे. त्याचा पहिला फटका अर्थातच LIC ला बसणार आहे. तरसर्वांचा विमा, सर्वांची सुरक्षा हे धोरण सरकार राबवणार आहे. केंद्र सरकारने नवीन विमान सुधारणा बिल 2025 आणलं आहे. त्यासाठी विमा क्षेत्रात सरकारने 100 % FDI ला मंजुरी दिली आहे.

केंद्र सरकारने विमा क्षेत्रात मोठा बदल केला आहे. सर्वांचा विमा, सर्वांची सुरक्षा (Sabka Bima Sabki Raksha) नावाने नवीन विमा सुधारणा बिल 2025 आणण्यात आले आहे. त्याला सरकाराने मंजूरी दिली आहे. विमा क्षेत्रात व्यापक बदल करण्यासाठी आणि परीघ वाढवण्यासाठी सरकारने या क्षेत्रात 100 टक्के परदेशी गुंतवणुकीला( FDI) हिरवा कंदिल दाखवला आहे. नवीन विमा बिलमध्ये LIC ला स्वातंत्र्य तर IRDAI अधिक अधिकार देण्यात आले आहेत.
आता वाढले विमा क्षेत्रात स्पर्धा
नवीन बिलात विमा कायदा 1938, LIC कायदा 1956 आणि IRDAI कायदा 1999 मध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. या नवीन बदलामुळे विमा क्षेत्राचा विस्तार होईल. तर ग्राहकांसाठी अनेक धमाकेदार योजना सादर होतील. नवीन विमा बिल परदेशी गुंतवणूक आणि नियमनासाठी मोठे पाऊल मानले जात आहे. तर परदेशी गुंतवणूक 74 टक्क्यांहून वाढवून 100 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल. परदेशी कंपन्या विमा क्षेत्रात आल्याने स्पर्धा वाढेल. त्यामुळे ग्राहकांसाठी धमाकेदार योजना येतील. तर ग्राहकांना आपल्याकडे वळवण्यासाठी विमा पॉलिसी स्वस्त होतील. तर त्यासोबत ग्राहकांना काही सोयी-सवलती पण मिळतील. दाव्यांचा निपटारा लवकर होईल. विमा कंपन्या विश्वासहर्यतेसाठी आणि चांगल्या सेवेसाठी प्रयत्न करतील. डिजिटलयाझेशनमुळे ग्राहकांना मोठा फायदा होईल.
LIC ला स्वातंत्र्य, ग्राहकांना फायदा काय?
नवीन विमा कायद्यातंर्गत LIC कायदा 1956 मध्ये मोठा बदल होईल. त्याचा फायदा जीवन विमा महामंडळाला होईल. एलआयसीला अधिक स्वातंत्र्य मिळेल. महामंडळ पॉलिसी तयार करण्यापासून ती बाजारात आणण्यासाठी वेळ लागणार नाही. त्यासाठी सरकारच्या मंजुरीची वाट पाहावी लागणार नाही. तसेच अधिकारी, कर्मचारी नियुक्ती आणि इतर अनेक बाबींसाठी एलआयसीला सरकारवर अवलंबून राहावे लागणार नाही. खासगी विमा कंपन्यांना टफ फाईट देण्यासाठी एलआयसी आता गतीने निर्णय घेऊ शकेल. तत्पर सेवेमुळे अगोदरच ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या एलआयसीला अधिक ग्राहक मिळतील.
ग्राहकांची इथं निराशा
दीर्घकाळापासून विमा कंपन्या एकत्रित परवान्याची मागणी करत आहेत. या कंपन्यांना जीवन आणि आरोग्य विमा एकाच छताखाली हवा आहे. म्हणजे त्यांना एकाचवेळी दोनही विमा विक्री करता येतील. पण याबाबतीत या बिलात काही खास तरतूद नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ग्राहकांना एकाच ठिकाणी दोन्ही विमा खरेदी करता येणार नाही.
