
टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात दौऱ्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफी टेस्ट सीरिज गमवावी लागली. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारताने 5 सामन्यांची मालिका 3-1 अशा फरकाने गमावली. त्याआधी न्यूझीलंडने भारतात येऊन टीम इंडियाला व्हाईट वॉश दिला. रोहित शर्मा या दोन्ही मालिकेत कर्णधार आणि फलंदाज म्हणूनही अपयशी ठरला. त्यामुळे रोहितवर चौफेर टीका केली जात होती. रोहितने टी 20i प्रमाणे कसोटी क्रिकेटमधून निवृत्त व्हावं आणि युवा खेळाडूंसाठी संधी उपलब्ध करुन द्यावी, असं म्हटलं जात होतं. तसेच रोहित शर्मा याच्या या निराशाजनक कामगिरीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर रोहितच्या कसोटी कारकीर्दीचा शेवट होईल, असं म्हटलं जात होतं. मात्र त्यानंतरह बीसीसीआयने रोहितवर विश्वास दाखवला आहे. बीसीसीआयने रोहितला त्याच्या वाढदिवशी मोठं गिफ्ट दिलं आहे.
आयपीएल 2025 नंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. याआधीच्या 2 कसोटी मालिकेतील कामगिरी पाहता रोहितऐवजी दुसर्या कुणाला इंग्लंड दौऱ्यात कर्णधार करण्यात येणार असल्याची चर्चा होती. इतकंच काय, तर रोहितला खेळाडू म्हणूनही डच्चू मिळणार, असं म्हटलं जात होतं. मात्र आता तसं काही होणार नाहीय. बीसीसीआय रोहितलाच कर्णधार म्हणून कायम ठेवणार असल्याचं समोर आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा भाग असणार आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआय निवड समितीने इंग्लंड दौऱ्यासाठी 35 खेळाडूंची नावं निश्चित केली आहेत.
हे सर्व खेळाडू 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यातील इंडिया ए टीमचा भाग असू शकतात. आयपीएल 2025 नंतर काही दिवसांनी या दौऱ्याला सुरुवात होईल.
इंग्लंड दौऱ्याबाबत 5 अपडेट्स
🚨 INDIA TOUR TO ENGLAND UPDATES 🚨 [TOI]
– Around 35 players have been shortlisted for India A & Senior team
– Rohit Sharma likely to continue as Captain
– Selectors are looking Patidar & Karun as Middle order options
– Sai Sudharsan likely to be the Backup opener
– Kuldeep set… pic.twitter.com/IzuJ6JqsGT— Johns. (@CricCrazyJohns) April 30, 2025
रोहित शर्मा इंडिया ए टीमसह इंग्लंड दौऱ्यावर रवाना होईल, अशी शक्यता आहे. टीम इंडियासाठी इंग्लंड दौरा आव्हानात्मक असणार आहे.त्यामुळे कणखर आणि मजबूत नेतृत्व असणं गरजेचं आहे, असं बीसीसीआयचं मत आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेनंतर रोहितची कर्णधापदावरुन उचलबांगडी होण्याची शक्यता होती. मात्र बीसीसीआयने रोहितवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.
रोहित व्यतिरिक्त करुण नायर याला अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर संधी मिळू शकते. सोबतच रजत पाटीदार याचीही निवड केली जा शकते. मिडल ऑर्डरमधील फलंदाज अपयशी ठरत असल्याने या दोघांना त्या स्थानी संधी मिळू शकते. या दोघांना इंडिया ए सीरिजसाठी संधी दिली जाऊ शकते.