IND vs ENG : ऋषभ पंत ड्रेसिंग रुममध्ये येताच केएल राहुलने जोडले हात, बीसीसीआयचा व्हिडीओ व्हायरल

कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसावर भारताने मजबूत पकड मिळवली आहे. पहिल्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारताने 3 गडी गमवून 359 धावा केल्या. शुबमन गिल नाबाद 127, तर ऋषभ पंत नाबाद 65 धावांवर खेळत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला आणि ऋषभ पंत तेव्हा ड्रेसिंग रुममध्ये आला तेव्हा वेगळच चित्र पाहायला मिळालं.

IND vs ENG : ऋषभ पंत ड्रेसिंग रुममध्ये येताच केएल राहुलने जोडले हात, बीसीसीआयचा व्हिडीओ व्हायरल
केएल राहुल आणि ऋषभ पंत
Image Credit source: video grab
| Updated on: Jun 21, 2025 | 3:25 PM

भारताने पहिल्या कसोटीचा पहिला दिवस गाजवला. कर्णधार शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल आणि विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंतने पहिल्या दिवशी धमाकेदार फलंदाजी केली. त्यामुळे पहिल्या दिवशीचा खेळ भारताचा नावावर राहीला. भारताने पहिल्या दिवशी 3 गडी गमवून 359 धावांची खेळी केली. आता दुसऱ्या दिवशी यात आणखी भर पडणार यात काही शंका नाही. कारण कर्णधार शुबमन गिल नाबाद 127, तर ऋषभ पंत नाबाद 65 धावांवर खेळत आहेत. या दोघांची जोडी दुसऱ्या दिवशीही जमली तर 450 पार धावा होऊ शकतात.दरम्यात ऋषभ पंतने लीड्समध्ये 65 धावांची खेळी करत एमएस धोनीचा विक्रम मोडला आहे. आता SENA देशांमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय विकेटकीपर ठरला आहे. तसेच इंग्लंडवर दबाव वाढू शकतो. पहिल्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर बीसीसीआयने ड्रेसिंग रुममधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ आता वेगाने व्हायरल होत आहे.

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा शुबमन गिल आणि ऋषभ पंत ड्रेसिंग रुममध्ये येत असताना टीम इंडियाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने त्यांचं जोरदार स्वागत केलं. सर्वांनी उभं राहून त्यांना त्यांच्या कामगिरीसाठी शाबासकी दिली. यावेळी केएल राहुलने शुबमन गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. तर ऋषभ पंत जेव्हा ड्रेसिंग रुमच्या दिशेने जात होता तेव्हा त्याने त्याच्यासमोर हात जोडले. ऋषभ पंतने दुसऱ्या चेंडूवरच इंग्लंडला तारे दाखवले होते. तसेच काही शॉट्स मारून इंग्लंडच्या गोलंदाजांना धक्का दिला. तसेच शेवटच्या षटकात ख्रिस वोक्सला षटकारही मारला. त्याच्या बिंधास्त अंदाज पाहून प्रत्येकाने त्याचं कौतुक केलं.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतकडे शतकी खेळी करण्याची संधी आहे. पंतच्या नावावर इंग्लंडमध्ये दोन शतक आहेत. यात एक शतक 2018 मध्ये, तर दुसऱं शतक 2022 मध्ये मारलं होतं. तर शुबमन गिलही द्विशतक ठोकू शकतो. या दोघांची जोडी जमली तर नक्कीच इंग्लंडवर दबाव वाढू शकतो. कारण भारताच्या ताफ्यात इंग्लंडच्या फलंदाजांना चीतपट करेल अशी गोलंदाजी आहे.