Sarfaraz Khan | जडेजाने सर्फराज खान याला आऊट केल्यावर रोहित शर्मा भडकला, व्हिडीओ व्हायरल

Ravindra Jadeja Runout Sarfaraz Khan Video : टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यामध्ये पदार्पणवीर सर्फराज खान रन आऊट झाला. रविंद्र जडेजाच्या चुकीच्या कॉलमुळे तो आऊट झाला. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Sarfaraz Khan | जडेजाने सर्फराज खान याला आऊट केल्यावर रोहित शर्मा भडकला, व्हिडीओ व्हायरल
Ravindra Jadeja Runout Sarfaraz Khan
Image Credit source: X
| Updated on: Feb 15, 2024 | 5:36 PM

मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमधील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी टीम इंडिया 326-5 धावा केल्या. रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. त्यासोबतच टीम इंडियाकडून सर्फराज खान याने दमदार पदार्पण केलं. पदार्पण सामन्यात सर्फराजने आक्रमक अर्धशतक करत धावगतीचा वेग वाढवला. सर्फराज आज शतक करणार असं वाटत होतं पण रविंद्र जडेजा याच्या चुकीच्या कॉलमुळे तो रनआऊट झाला. सर्फराज आऊट झाल्यावर कॅप्टन रोहित शर्मा ड्रेसिंग रूममध्ये भडकलेला दिसला.

पाहा व्हिडीओ:-

 

रविंद्र जडेजा 99 धावांवर असताना त्याने एक चोरटी धाव काढण्याच्या प्रयत्नात सर्फराज खान याला कॉल केला. मात्र चेंडू थेट मार्क वुड याच्या हातात गेला होता. जडेजा माघारी फिरला परंतु सर्फराज पुढे आला होता, वुडने थ्रो करत सर्फराज खान याला रनआऊट केलं.

रोहित शर्मा भडकलेला व्हिडीओ:-

 

सर्फराज खान बॅटींगला आल तेव्हा सुरूवातीला दबकत होता. गड्याने खातं खोलल्यावर  इंग्ल्डंडच्या एकाही गोलंदाजाला सोडलं नाही. सर्फराज खान याने प्रत्येकालाच झोडलेलं पाहायला मिळालं. सर्फराज खान 66 बॉलमध्ये 62 धावा केल्या. यामध्ये त्याने 9 चौकार आणि 1 षटकार मारला.  पदार्पण सामन्यात सर्फराज खानने 48 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं.

दरम्यान, पहिल्य दिवसाचा खेळ संपल्यावर रविंद्र जडेजा नाबाद 110 आणि कुलदीप यादव 1 धाव काढून नाबद आहे. इंग्लंड संघाकडून मार्क वुड याने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.