IND vs ENG: विराट कोहली पुन्हा लीडरच्या रोलमध्ये, राहुल द्रविड यांच्या विनंतीला दिला मान, पहा VIDEO

IND vs ENG: भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल (India England Tour) झाला आहे. येत्या 1 जुलैपासून कसोटी सामन्याने भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याला सुरुवात होत आहे. कसोटी आधी 24 जून पासून टीम इंडिया लेसेस्टरशायर विरुद्ध प्रॅक्टिस मॅचही खेळणार आहे.

IND vs ENG: विराट कोहली पुन्हा लीडरच्या रोलमध्ये, राहुल द्रविड यांच्या विनंतीला दिला मान, पहा VIDEO
Team india
Image Credit source: BCCI
| Updated on: Jun 22, 2022 | 11:53 AM

मुंबई: भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल (India England Tour) झाला आहे. येत्या 1 जुलैपासून कसोटी सामन्याने भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याला सुरुवात होत आहे. कसोटी आधी 24 जून पासून टीम इंडिया लेसेस्टरशायर विरुद्ध प्रॅक्टिस मॅचही खेळणार आहे. हा सराव सामना टीम इंडियासाठी सोपा नसेल. कारण इंग्लंडमध्ये खेळताना तिथल्या वातावरणाशीही सामना असतो. इंग्लिश कंडिशन्सशी तुम्हाला जळवून घ्यावं लागतं. स्विंग होणारे चेंडू खेळणं इतक सोप नाहीय. टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळेच त्यांनी मंगळवारी संध्याकाळी माजी कर्णधार विराट कोहलीवर (Virat kohli) महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. कोहली यावेळी संघातील प्रत्येक खेळाडूला मार्गदर्शन करताना दिसला. लेसेस्टरशायर विरुद्धच्या सराव सामन्याआधी तो खेळाडूंना प्रोस्ताहित करताना, मार्गदर्शन करताना दिसला. या व्हिडिओमध्ये राहुल द्रविड विराट कोहलीच्या शेजारी उभे असलेले दिसतात. विराट कोहलीने सहकारी खेळाडूंबरोबर इंग्लंडमधल्या कंडिशन्सबद्दल आपले अनुभव शेअर केले.

भारताला इंग्लंडमध्ये सीरीज जिंकण्याची संधी

मागच्यावर्षी बाकी राहिलेल्या कसोटी मालिकेतील हा कसोटी सामना आहे. त्यावेळी विराट कोहली कर्णधार होता. टीम इंडिया या सीरीजमध्ये 2-1 ने पुढे आहे. भारताने सामना जिंकला किंवा ड्रॉ केला, तर भारताला मालिका विजयाची चांगली संधी आहे. यावर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर विराट कोहलीने कसोटीचे कर्णधारपद सोडलं. आता रोहित शर्मा वनडे, टी 20 आणि टेस्ट या तिन्ही फॉर्मेटमध्ये कॅप्टन आहे.

भारताच्या तयारीत पावसाचा व्यत्यय

इंग्लंडमध्ये ढगाळ वातावरण असतं, हवा असते. मध्येच पाऊस येतो. वातावरणात झटपट होणाऱ्या या बदलांशी खेळाडुंना जुळवून घ्यावं लागतं. त्यामुळे इंग्लंड दौरा खऱ्याअर्थाने परीक्षा पाहणारा आहे. वेदर रिपोर्ट्नुसार लेसेस्टरशायर विरुद्धच्या सराव सामन्यावेळी चारही दिवस पाऊस कोसळू शकतो. इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटीआधी भारताच्या तयारीत पाऊस व्यत्यय आणू शकतो. भारतीय संघातील बहुतांश खेळाडू सध्या फॉर्मसाठी चाचपडत आहेत. यात विराट कोहली, कॅप्टन रोहित शर्मा सुद्धा आहे.