IND vs ENG: इंग्लंडमधून मोठी बातमी, पहिल्या टी 20 सामन्यात राहुल द्रविड हेड कोच नसतील

| Updated on: Jul 04, 2022 | 3:44 PM

IND vs ENG: एजबॅस्टन मध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यानंतर टीम इंडिया 7 जुलैपासून इंग्लंड विरुद्ध तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही सीरीज सुरु होण्याआधी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

IND vs ENG: इंग्लंडमधून मोठी बातमी, पहिल्या टी 20 सामन्यात राहुल द्रविड हेड कोच नसतील
Rahul dravid-Rishabh pant
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई: एजबॅस्टन मध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यानंतर टीम इंडिया 7 जुलैपासून इंग्लंड विरुद्ध तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही सीरीज सुरु होण्याआधी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राहुल द्रविड (Rahul Dravid) पहिल्या टी 20 सामन्यासाठी हेड कोच नसतील. त्यांच्याजागी व्ही.व्ही.एस लक्ष्मण (Vvs Laxman) पहिल्या टी 20 लढतीच्यावेळी हेड कोचची जबाबदारी संभाळणार आहेत. पाच जुलैपर्यंत कसोटी सामना चालणार आहे. पहिल्या टी 20 साठी विराट कोहली, ऋषभ पंत आणि ऋषभ पंत (Rishabh pant) यांचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. आयर्लंड सीरीजमधील संघच इंग्लंडला पहिल्या टी 20 मध्ये भिडणार आहे. कसोटी सामन्यानंतर विश्रांती मिळावी, यासाठी तिघांचा पहिल्या टी 20 त समावेश केलेला नाही. भारतीय संघ टी 20 नंतर लगेच वनडे सीरीजही खेळणार आहे. टी 20 सीरीज मध्ये रोहित शर्माच कॅप्टन असेल. फक्त पहिल्या सामन्यासाठी हेड कोचची जबाबदारी लक्ष्मण यांच्याकडे असेल. लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने आयर्लंड सीरीजमध्ये 2-0 ने विजय मिळवला.

7 जुलैपासून मर्यादीत षटकांच्या सीरीजला सुरुवात

भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध पहिली टी 20 मॅच 7 जुलैला साउथॅम्पटनमध्ये खेळणार आहे. त्यानंतर बर्मिंघम मध्ये 9 जुलैला दुसरा सामना होईल. तिसरा टी 20 सामना नॉटिंघम मध्ये 10 जुलैला खेळला जाईल. वनडे सीरीज 12 जुलैपासून सुरु होईल. पहिली वनडे ओव्हलवर दुसरी मॅच लॉर्ड्सवर होणार आहे. 17 जुलैला मॅन्चेस्टर येथे तिसरा वनडे सामना होईल.

पहिल्या टी 20 साठी संघ

रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक

दुसऱ्या आणि तिसऱ्या टी 20 साठी संघ

रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, जसप्रीत बुमराह

एकदिवसीय मालिकेसाठी संघ

रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवींद्र जाडेजा, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा,