
टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील आपल्या सलामीच्या सामन्यात आयर्लंड विरुद्ध टॉस जिंकला आहे. कॅप्टन रोहित शर्मा याने फिल्डिंगचा निर्णय घेत आयर्लंडला बॅटिंगसाठी बोलावलं आहे. रोहित शर्माने या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये आश्चर्यकारक बदल केले आहेत. रोहितने संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या चौघांना वगळलं आहे. विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन आणि ऋषभ पंत या दोघांपैकी कुणाला संधी मिळणार याकडे सर्वाचं लक्ष होतं. मात्र रोहितने ऋषभ पंत याला पसंती दिली आहे.
टीम इंडियाला नवी ओपनिंग जोडी मिळाली आहे. आयर्लंड विरुद्ध रोहित शर्मा याच्यासह विराट कोहली हा ओपनिंग करणार आहे. यशस्वी जयस्वाल याचा प्लेईंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे रोहित-विराट ही जोडी सलामीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून विराटला ओपनिंगला यायला हवं, असं म्हटलं जात होतं. अखेर क्रिकेट चाहत्यांची ती इच्छा पूर्ण झाली आहे.
रोहितने कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या कुलचा जोडीचा समावेश केलेला नाही. रोहितने 3 ऑलराउंडर्स, 3 फास्टर्सना संधी दिली आहे. उपकर्णधार हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे या तिघांवर बॉलिंग आणि बॅटिंग अशी दुहेरी जबाबदारी असणार आहे. तसेच जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंह या तिघांच्या खांद्यावर वेगवान बॉलिंगची धुरा असणार आहे.
टीम इंडियाच्या बाजूने नाणफेकीचा कौल
🚨 Toss Update from New York 🚨
Captain @ImRo45 has won the toss & #TeamIndia have elected to bowl against Ireland.
Follow The Match ▶️ https://t.co/YQYAYunZ1q#T20WorldCup | #INDvIRE pic.twitter.com/bNQaPO854i
— BCCI (@BCCI) June 5, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.
आयर्लंड प्लेइंग ईलेव्हन : पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल आणि बेंजामिन व्हाइट.