IND vs NZ : न्यूझीलंडच्या बॉल टु बॉल रन्स, टीम इंडियासमोर 301 धावांचं आव्हान, कोण जिंकणार पहिला सामना?

India vs New Zealand 1st Odi : न्यूझीलंडने कोटंबी स्टेडियममध्ये भारतीय गोलंदाजांसमोर 300 धावा केल्या. आता भारतीय फलंदाज विजयी धावा पूर्ण करणार की नाही? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

IND vs NZ : न्यूझीलंडच्या बॉल टु बॉल रन्स, टीम इंडियासमोर 301 धावांचं आव्हान, कोण जिंकणार पहिला सामना?
New Zealand vs India 1st Odi
Image Credit source: @BLACKCAPS X Account
| Updated on: Jan 11, 2026 | 8:23 PM

न्यूझीलंडने टीम इंडियासमोर पहिल्या एकदिवसीय सामन्यात (India vs New Zealand 1st Odi) 301 धावांचं आव्हान ठेवलं आहे. न्यूझीलंडने बडोद्यातील कोटांबी स्टेडियममध्ये 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 300 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी डेव्हॉन कॉनव्हे आणि हेन्री निकोलस या सलामी जोडीने अर्धशतकी खेळी केली. तसेच डॅरेल मिचेल याने सर्वाधिक धावा केल्या. तसेच इतरांनीही योगदान दिलं. न्यूझीलंडच्या या 3 फलंदाजांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनाही ठिकठाक सुरुवात मिळाली. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर या सुरुवातीनंतरही मोठी खेळी करता आली नाही. भारतीय गोलंदाजांनी वेळीच न्यूझीलंडला ठराविक अंतराने झटके दिले. त्यामुळे भारताला न्यूझीलंडला 300 धावांपर्यंत रोखण्यात यश आलं. त्यामुळे आता टीम इंडिया 301 धावा करत पहिला विजय मिळवणार की न्यूझीलंड मैदान मारणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

न्यूझीलंडची कडक सुरवात,  पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी

कर्णधार शुबमन गिल याने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं.  न्यूझीलंडच्या सलामी जोडीने या संधीचा फायदा घेतला आणि नववर्षातील पहिल्या सामन्यात संघासाठी सलामी शतकी भागीदारी केली. डेव्हॉन कॉनव्हे आणि हेन्री निकोलस या सलामी जोडीने शतकी भागीदारी करुन न्यूझीलंडला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी या दरम्यान वैयक्तिक अर्धशतक झळकावलं. भारतासाठी  ही जोडी डोकेदुखी ठरत होती. मात्र हर्षित राणा याने ही डोकेदुखी दूर केली. हर्षितने न्यूझीलंडला 117 धावांवर पहिला झटका दिला.  हर्षितने हेन्री निकोल्स याला आऊट केलं. निकोल्सने 69 बॉलमध्ये 8 फोरसह 62 रन्स केल्या.

त्यानंतर टीम इंडियाने जोरदार कमबॅक केलं. भारताने न्यूझीलंडला झटपट झटके दिले. हर्षित राणा याने निकोल्सनंतर कॉनव्हेला आऊट केलं आणि न्यूझीलंडच्या सलामी जोडीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. कॉनव्हेने 67 बॉलमध्ये 6 फोर आणि 1 सिक्ससह 56 रन्स केल्या. डॅरेल मिचेल याने 71 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 5 फोरसह सर्वाधिक 84 रन्स केल्या. तर डेब्यूटंट क्रिस्टियन क्लार्क याने 21 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांसमोर या चौघांपैकी न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला 20 पार मजल मारता आली नाही.

विकेटकीपर मिचेल हे याने 18 धावा केल्या. कॅप्टन मायक ब्रेसवेल याने 16 रन्स केल्या. तर विल यंग आणि ग्लेन फिलिप या दोघांनी प्रत्येकी 12-12 धावा केल्या. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा आणि हर्षित राणा या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर कुलदीप यादव याने 1 विकेट मिळवली.