IND vs NZ 1st Odi : टीम इंडियाने टॉस जिंकला, 6 गोलंदाजांचा समावेश, रोहित-विराट खेळणार की नाही?
India vs New Zealand 1st Odi Toss Result and Playing 11 : भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजयी धावांचा पाठलाग करण्याचं ठरवलं आहे.न्यूझीलंड आता भारतासमोर किती धावांचं आव्हान ठेवणार? हे जाणून घेऊयात.

टीम इंडियाने 2026 वर्षातील पहिलाच टॉस जिंकला आहे. न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात (India vs New Zealand 1st Odi Toss) कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) याच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कर्णधार शुबमनने बडोद्यातील कोटांबी स्टेडियममध्ये फिल्डिंगचा निर्णय घेत न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. या सामन्यात टीम इंडिया तब्बल 6 गोलंदाजांसह खेळणार आहे. तसेच या सामन्यातून प्लेइंग ईलेव्हनमध्ये तिघांचं कमबॅक झालं आहे.
तिघांचं कमबॅक
टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कर्णधार शुबमन गिल, उपकर्णधार श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज या तिघांचं कमबॅक झालंय. शुबमनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत तर श्रेयसला ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरिजमध्ये दुखापत झाली होती. त्यानंतर आता दोघांचं कमबॅक झालंय. तर मोहम्मद सिराजने अखेरचा एकदिवसीय सामना हा 25 ऑक्टोबर 2025 रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता.
प्लेइंग ईलेव्हनमध्ये 6 गोलंदाज
टीम इंडिया या सामन्यात 6 गोलंदाजांसह मैदानात उतरणार असल्याचं कर्णधार शुबमनने टॉसनंतर सांगितलं. या गोलंदाजांमध्ये 3 वेगवान आणि 3 फिरकीपटूंचा समावेश आहे. रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव या तिघांवर फिरकी गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे. तर हर्षित राणा, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा या तिघांवर वेगवान गोलंदाजीची भिस्त असणार आहे.
क्रिस्टियन क्लार्कचं पदार्पण
तसेच न्यूझीलंडकडून 24 वर्षीय युवा क्रिस्टियन क्लार्क याचं पदार्पण झालं. क्रिस्टियन क्लार्क याचं पदार्पण होणार असल्याचं सामन्याच्या पूर्वसंध्येला कर्णधार मायकल ब्रेसवेल याने सांगितलं होतं.
टीम इंडिया न्यूझीलंडवर वरचढ
भारताने मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध गेल्या सलग 7 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तसेच उभयसंघांचा एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात एकूण 40 वेळा आमनासामना झाला आहे. भारताने त्यापैकी 31 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडला केवळ 8 सामनेच जिंकता आले आहेत. तर एका सामन्याचा निर्णय लागला नाही.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन: डेव्हॉन कॉनव्हे, हेन्री निकोल्स, विल यंग, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल हे (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झॅक्री फाउल्क्स, क्रिस्टियन क्लार्क, काइल जेमिसन आणि आदित्य अशोक.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.
