AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : भारत-न्यूझीलंड पहिल्या वनडेआधी कर्णधाराची मोठी घोषणा, नक्की काय?

India vs New Zealand 1st ODI : बडोदातील कोटांबी स्टेडियममध्ये होणारा भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना हा 24 वर्षीय गोलंदाजासाठी अविस्मरणीय ठरणार आहे. हा खेळाडू या सामन्यातून एकदिवसीय पदार्पण करणार असल्याची माहिती कर्णधाराने दिली आहे.

IND vs NZ : भारत-न्यूझीलंड पहिल्या वनडेआधी कर्णधाराची मोठी घोषणा, नक्की काय?
India vs New ZealandImage Credit source: Bcci
| Updated on: Jan 11, 2026 | 2:19 AM
Share

टीम इंडिया आणि न्यूझीलंड (India vs New Zealand Odi Series 2026) यांच्यात 11 ते 18 जानेवारी दरम्यान एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात या मालिकेत एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. दोन्ही संघ 2026 वर्षातील आपला पहिला आणि एकदिवसीय सामना हा रविवारी 11 जानेवारीला बडोदातील कोटांबी स्टेडियममध्ये (BCA Stadium, Kotambi) खेळणार आहेत.  कोटांबी स्टेडियममध्ये होणारा हा पहिलाच सामना असणार आहे. त्यामुळे पहिल्या सामन्याला बीसीसीआय आणि बडोदा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.  या सामन्यातून 24 वर्षीय युवा आणि वेगवान गोलंदाज एकदिवसीय पदार्पण करणार असल्याचं निश्चित आहे. याबाबतची माहिती स्वत: कर्णधाराने पत्रकार परिषदेदरम्यान दिली. तो 24 वर्षीय गोलंदाज कोण आहे? हे जाणून घेऊयात.

न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाचं टीम इंडिया विरुद्ध पदार्पण होणार आहे. हा गोलंदाज एकदिवसीय क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणार आहे. ख्रिस्टीयन क्लार्क असं या न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाचं नाव आहे. क्लार्कचा याआधी कसोटी संघात समावेश करण्यात आला होता. मात्र तेव्हा त्याला प्लेइंग ईलेवहनमध्ये संधी मिळाली नाही. त्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार मायकल ब्रेसवेल यानेच क्लार्क बडोद्यात पदार्पण करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.

कर्णधार मायकल ब्रेसवेलने काय म्हटलं?

“आम्ही प्लेइंग ईलेव्हन निश्चित केलेली नाही. मात्र क्लार्क रविवारी होणाऱ्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण करणार असल्याचं निश्चित आहे. क्लार्कसाठी ही चांगली संधी आहे. क्लार्कने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि इथवरच्या तयारीपर्यंत चांगली बॉलिंग केली आहे”, असं मायकल ब्रेसवेल याने नमूद केलं.

क्लार्कची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी

क्लार्कने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. क्लार्कने आतापर्यंत 28 फर्स्ट क्लास आणि 34 लिस्ट ए सामने खेळले आहेत. क्लार्कने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 79 तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये 52 विकेट्स मिळवल्या आहेत. विशेष म्हणजे क्लार्कने लिस्ट ए क्रिकेटमध्ये शतक झळकावलं आहे. त्यामुळे क्लार्क बॉलिंगसह बॅटिंगनेही योगदान देऊ शकतो.

सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजता टॉस होणार आहे. उभयसंघातील सामना हा टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील विविध चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर जिओहॉटस्टार या एपद्वारे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना मोबाईल आणि लॅपटॉपद्वारे पाहता येईल.

कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा; संजय राऊत भाजपवर संतापले
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा; संजय राऊत भाजपवर संतापले.
दगडू सकपाळ यांचा शिवसेना प्रवेश, शिंदेंनी व्यक्त केल्या भावना
दगडू सकपाळ यांचा शिवसेना प्रवेश, शिंदेंनी व्यक्त केल्या भावना.
... याला जशास तसे उत्तर देईल; नितेश राणेंचा पलटवार
... याला जशास तसे उत्तर देईल; नितेश राणेंचा पलटवार.
नितेश राणेंच्या घराबाहेर सापडली अज्ञात बॅग! बॉम्बशोधक पथकाकडून तपास
नितेश राणेंच्या घराबाहेर सापडली अज्ञात बॅग! बॉम्बशोधक पथकाकडून तपास.
लाडक्या बहिणीला 1500 मिळणार; काँग्रेसच्या टीकेचा भाजपकडून खरपूस समाचार
लाडक्या बहिणीला 1500 मिळणार; काँग्रेसच्या टीकेचा भाजपकडून खरपूस समाचार.
बाळासाहेबांवरून फडणवीस आणि ठाकरेंमध्ये जुंपली!
बाळासाहेबांवरून फडणवीस आणि ठाकरेंमध्ये जुंपली!.
गौतमी पाटील चंद्रपुरात प्रचाराला, वडेट्टीवार आणि मुनगंटीवारांत जुंपली
गौतमी पाटील चंद्रपुरात प्रचाराला, वडेट्टीवार आणि मुनगंटीवारांत जुंपली.
फडणवीस आमचे शत्रू नाहीत, ते...; संजय राऊतांचं मोठं विधान
फडणवीस आमचे शत्रू नाहीत, ते...; संजय राऊतांचं मोठं विधान.
तुषार आपटे प्रकरण : टीकेनंतर भाजपची माघार? काय म्हणाले राऊत | VIDEO
तुषार आपटे प्रकरण : टीकेनंतर भाजपची माघार? काय म्हणाले राऊत | VIDEO.
अत्याचाराचा आरोप असलेल्यांना स्वीकृत नगरसेवक करता? राऊतांचा हल्ला
अत्याचाराचा आरोप असलेल्यांना स्वीकृत नगरसेवक करता? राऊतांचा हल्ला.