IND vs NZ : रविवारपासून वनडे सीरिजचा थरार, पहिल्या सामन्याला किती वाजता सुरुवात?
India vs New Zealand 1st Odi Live Streaming : टीम इंडिया न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाली आहे. उभयसंघातील पहिला सामना हा बडोद्यातील कोतंबी स्टेडियममध्ये होणार आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेच्या थराराला अवघे काही तास बाकी आहेत. टीम इंडिया मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध एकूण 3 एकदिवसीय सामने खेळणार आहेत. या मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. भारतीय चाहत्यांसाठी ही मालिका फार खास असणार आहे. कर्णधार आणि उपकर्णधार शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर या दोघांचं या मालिकेतून संघात पुनरागमन झालं आहे. तर रोहित शर्मा आणि विराट कोहली ही अनुभवी जोडी या मालिकेत खेळताना दिसणार आहेL. उभयसंघातील पहिला सामना कधी आणि कुठे पाहता येणार? हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला एकदिवसीय सामना कधी?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला एकदिवसीय सामना रविवारी 11 जानेवारीला होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला एकदिवसीय सामना कुठे?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला एकदिवसीय सामना ह बडोद्यातील बीसीए स्टेडियम, कोतंबी इथे आयोजित करण्यात आला आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या एकदिवसीय सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजता टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला एकदिवसीय सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला एकदिवसीय सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला एकदिवसीय सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला एकदिवसीय सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.
कोण करणार विजयी सुरुवात?
शुबमन गिल दुखापतीनंतर या मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. शुबमनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे शुबमनला उर्वरित सामन्यांना मुकावं लागलं होतं. त्यानंतर आता शुबमनचं भारतीय संघात कमबॅक झालंय. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापत झाल्यानंतर आता उपकर्णधार श्रेयस अय्यरही भारतीय संघात परतला आहे.
न्यूझीलंडचा कॅप्टन कोण?
मायकल ब्रेसवेल याच्याकडे न्यूझीलंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. न्यूझीलंड या मालिकेत त्यांच्या प्रमुख खेळाडूंशिवाय खेळणार आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा कस लागणार आहे.न्यूझीलंड यजमान टीम इंडिया विरुद्ध कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशात आता टीम इंडिया नववर्षाची सुरुवात विजयाने करणार की न्यूझीलंड यजमानांना लोळवणार? यासाठी निकालापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
