
भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील दुखापतीनंतर नववर्षात मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय मालिकेतून (India vs New Zealand Odi Series 2026) पुनरागमन केलं. श्रेयसने बडोद्यात पहिल्या सामन्यात 301 धावांचा पाठलाग करताना भारतासाठी 49 धावांची निर्णायक खेळी केली. श्रेयसचं अर्धशतक अवघ्या 1 धावेने हुकलं. मात्र श्रेयसने तो पुन्हा एकदा धमाका करण्यासाठी सज्ज असल्याचं जाहीर केलं. भारताने पहिला सामना जिंकून 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता उभयसंघातील दुसरा सामना 14 जानेवारीला होणार आहे. श्रेयसला या सामन्यात मोठी कामगिरी करण्याची संधी आहे.
श्रेयससाठी बुधवारी होणारा दुसरा एकदिवसीय सामना खास ठरणार आहे. श्रेयसला राजकोटमध्ये होणाऱ्या सामन्यात इतिहास घडवण्याची संधी आहे. श्रेयस एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3 हजार धावा करण्याच्या उंबरठ्यावर आहे. श्रेयसला त्यासाठी अवघ्या 34 धावांची गरज आहे. श्रेयसने दुसऱ्या सामन्यात 34 रन्स करताच तो भारतासाठी वेगवान 3 हजार एकदिवसीय धावा करणारा फलंदाज ठरेल. तसेच श्रेयस यासह रोहित शर्मा, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर या सारख्या दिग्गज फलंदाजांना मागे टाकेल.
श्रेयसने आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमधील 68 डावांत 2 हजार 966 धावा केल्या आहेत. श्रेयस 34 धावा करताच त्याच्या 69 डावात 3 हजार धावा पूर्ण होतील. श्रेयस यासह भारताकडून कमी डावात 3 हजार एकदिवसीय धावा करणारा फलंदाज ठरेल. सध्या भारतासाठी वेगवान 3 हजार धावांचा विक्रम माजी फलंदाज गब्बर अर्थात शिखर धवन याच्या नावावर आहे. धवनने 72 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. त्यानंतर विराट दुसऱ्या तर सचिन तिसर्या स्थानी विराजमान आहे.
शिखर धवन : 72 सामने
विराट कोहली – 75 सामने
केएल राहुल – 78 सामने
नवजोतसिंह सिद्धू : 79 सामने
सौरव गांगुली : 82 सामने
तसेच श्रेयस 69 डावांत 3 हजार धावा करताच वेस्ट इंडिजचे महान दिग्गज फलंदाज व्हीव्हीयन रिचर्ड्स यांच्या विक्रमाची बरोबरी साधेल. श्रेयस आणि रिचर्ड्स यांच्या पुढे या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम आमला, विंडीजचा शाई होप आणि पाकिस्तानचा शाई होप आहेत.