India vs New Zealand Match Report: टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून वनडे सीरीजमध्ये पराभव

| Updated on: Nov 30, 2022 | 2:55 PM

India vs New Zealand Match Report: T20 मध्ये हरले, पण न्यूझीलंडने वनडे मालिका जिंकली.

India vs New Zealand Match Report: टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून वनडे सीरीजमध्ये पराभव
ind vs nz
Image Credit source: PTI
Follow us on

ख्राइस्टचर्च: न्यूझीलंडने T20 सीरीज गमावली. पण वनडे सीरीज जिकंली आहे. केन विलयम्सनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने वनडे सीरीज 1-0 ने जिंकली. वनडे सीरीजचा आजचा तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. पहिल्या वनडेत टीम इंडियाचा पराभव झाला होता. दुसरी वनडे पावसामुळे रद्द झाली होती. अशा प्रकारे टी 20 प्रमाणे वनडेमध्ये सुद्धा दोन सामने पावसामुळे रद्द झाले. तिसऱ्या वनडेतही टीम इंडिया पराभवाच्या उंबरठ्यावर होती. पण पावसाने पराभव टाळला.

डकवर्थ लुइस नियम का लागू झाला नाही?

टीम इंडियाने फक्त 219 धावा केल्या होत्या. न्यूझीलंड टीमच्या 18 ओव्हरमध्ये 104 धावा झाल्या होत्या. ख्राइस्टचर्चमध्ये अचानक पावसाला सुरुवात झाली. डकवर्थ लुइस नियमाच्या हिशाबाने मॅचचा निकाल लागला नाही. वनडे क्रिकेटमध्ये मॅचचा रिझल्ट लागण्यासाठी दोन्ही इनिंगमध्ये कमीत कमी 20 ओव्हर्सचा खेळ होणं आवश्यक आहे.

टीम इंडियाची फलंदाजी फ्लॉप

ख्राइस्टचर्चमध्ये टीम इंडियाचे फलंदाज फ्लॉप ठरले. फक्त वॉशिंग्टन सुंदर आणि श्रेयस अय्यरने विकेटवर टिकून फलंदाजी केली. सुदंरने 51 आणि श्रेयस अय्यरने 49 धावा केल्या. त्याशिवाय कॅप्टन शिखर धवन 28, शुभमन गिल 13, ऋषभ पंतने 10 धावा केल्या. सूर्यकुमार यादव 6 रन्सवर आऊट झाला. दीपक हुड्डाने 12 धावा केल्या.

न्यूझीलंडच कमालीच प्रदर्शन

पावसाने प्रभावित या सामन्यात न्यूझीलंडचा ओपनर फिन एलेनने शानदार अर्धशतक झळकावलं. त्याने 54 चेंडूत 57 धावा केल्या. डेवॉन कॉन्वेने नाबाद 38 धावा फटकावल्या. भारतासाठी एकमेव विकेट उमरान मलिकने घेतला. न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेलने 3 विकेट काढल्या. एडम मिल्नेने सुद्धा 3 विकेट काढल्या. टिम साऊदीने दोन विकेट काढल्या. लॉकी फर्ग्युसन आणि सँटनरने प्रत्येकी एक विकेट काढली.