IND vs NZ | मोहम्मद शमीचा वानखेडेत सत्ते पे सत्ता, झहीर खानचा 12 वर्षांपूर्वींचा रेकॉर्ड ब्रेक

Mohammed Shami India vs New Zealand | टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडवर 70 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह न्यूझीलंडचा 4 वर्षांपूर्वीचा हिशोब चुकता केला.

IND vs NZ | मोहम्मद शमीचा वानखेडेत सत्ते पे सत्ता, झहीर खानचा 12 वर्षांपूर्वींचा रेकॉर्ड ब्रेक
| Updated on: Nov 16, 2023 | 12:06 AM

मुंबई | टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. टीम इंडियाने पहिल्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडवर 70 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 398 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र मोहम्मद शमीच्या धारदार बॉलिंग आणि भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडने गुडघे टेकले. शमीच्या बॉलिंगसमोर न्यूझीलंड 327 धावांवर ऑलआऊट झाली. मोहम्मद शमी टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. मोहम्मद शमीने सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. शमीने यासह टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याचा 12 वर्षांपूर्वींचा रेकॉर्ड ब्रेक केला.

मोहम्मद शमीने न्यूझीलंड विरुद्ध 57 धावांच्या मोबदल्यात 7 विकेट्स घेतल्या. यासह शमीच्या या वर्ल्ड कपमध्ये 23 विकेट्स झाल्या. शमी यासह एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. शमीने याबाबतीत झहीर खानला मागे टाकलं. झहीर खान याने वर्ल्ड कप 2011 मध्ये टीम इंडियासाठी 21 विकेट्स घेतल्या होत्या. तेव्हा टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला होता.

तसेच शमीच्या नावावर वर्ल्ड कपमध्ये एकूण 54 विकेट्सची नोंद झाली आहे. शमीने वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत झहीर खान आणि जवागल श्रीनाथ यांना मागे टाकलं. झहीर आणि जवागल या दोघांनी वर्ल्ड कपमध्ये प्रत्येकी 44-44 धावा केल्या. तसेच शमी वर्ल्ड कप इतिहासात वेगवान 50 विकेट्स घेणाारा पहिला गोलंदाज ठरला आहे. शमीने 17 डावांमध्ये वर्ल्ड कपमधील विकेट्सचं अर्धशतक पूर्ण केलं. शमीने याबाबतीत ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क याला मागे टाकलं. स्टार्क याने 19 डावांमध्ये 50 विकेट्स घेतल्या होत्या.

मॅन ऑफ द मॅच शमी

न्यूझीलंड प्लेईंग इलेव्हन | केन विल्यमसन (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (विकेटकीपर), मिचेल सँटनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेंट बोल्ट.

टीम इंडिया प्लेईग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.