IND vs NZ : भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेतून स्टार खेळाडू बाहेर, दुखापतीमुळे टीमला झटका

India vs New Zealand Test Series: कसोटी मालिकेआधी टीमला मोठा झटका लागला आहे. दुखापतीमुळे युवा खेळाडू मालिकेतून बाहेर पडला आहे.

IND vs NZ : भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेतून स्टार खेळाडू बाहेर, दुखापतीमुळे टीमला झटका
team india vs new zealand
Image Credit source: bcci
| Updated on: Oct 15, 2024 | 6:01 PM

टीम इंडिया बांगलादेशला लोळवल्यानंतर मायदेशात पुन्हा एकदा कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरिज खेळणार आहे. या मालिकेत एकूण 3 सामने होणार आहे. सलामीचा सामना हा बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याचं आयोजन हे 16 ते 20 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आलं आहे. मात्र त्याआधी न्यूझीलंडला मोठा झटका लागला आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज बेन सियर्स हा दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. सियर्सच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने त्याला या मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. सियर्सला श्रीलंका दौऱ्यात ही दुखापत झाली होती.

सियर्सच्या गुडघ्याला असलेल्या दुखापतीमुळे त्याचं भारत दौऱ्यात येण्याचं निश्चित नव्हतं. मात्र त्यानंतर सियर्सच्या दुखापत झालेल्या भागावर आवश्यक ते उपचार करण्यात आले. सियर्सच्या दुखापतीच्या गंभीरतेवरुन त्याला भारत दौऱ्यात न खेळवण्याचा निर्णय न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने घेतला. आता बेन सियर्सच्या जागी जॅकब डफी याचा भारत दौऱ्यासाठी समावेश करण्यात आला आहे. बेन सियर्सने याच वर्षी कसोटी पदार्पण केलं. बेन एकमेव कसोटी सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला आहे. बेनने या सामन्यात 5 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच बेन श्रीलंका दौऱ्यातही होता. मात्र त्याला दुखापतीमुळे खेळता आलं नाही.

जेकब डफीला संधी

दरम्यान बेन सियर्स याच्या जागी जेकब डफी याचा समावेश करण्यात आला आहे. जेकबने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये एकूण 299 विकेट्स घेतल्या आहेत. जेकबने न्यूझीलंडचं 6 एकदिवसीय आणि 14 टी 20i सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. तर आता त्याला कसोटी पदार्पणाची प्रतिक्षा असणार आहे.

न्यूझीलंडला मोठा झटका

कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव , मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.

कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडची सुधारित : टॉम लॅथम (कॅप्टन), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकल ब्रेसवेल (पहिल्या कसोटीसाठी), मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉनव्हे, मॅट हेनरी, डॅरल मिचेल, विल ओ रुर्के, एझाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, जेकब डफी, इश सोढी (दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी), टीम साउथी, केन विलियमसन आणि विल यंग.