AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : वनडे मालिकेत विराट कोहली रचणार 10 विक्रम, काय ते जाणून घ्या

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 11 जानेवारीपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. ही मालिका विराट कोहलीसाठी खास असणार आहे. कारण विराट कोहली या मालिकेत काही विक्रमांना गवसणी घालणार आहे. चला जाणून घेऊयात...

IND vs NZ : वनडे मालिकेत विराट कोहली रचणार 10 विक्रम, काय ते जाणून घ्या
IND vs NZ : वनडे मालिकेत विराट कोहली रचणार 10 विक्रम, काय ते जाणून घ्याImage Credit source: टीव्ही 9 हिंदीवरून
| Updated on: Jan 05, 2026 | 3:44 PM
Share

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी शुबमन गिलच्या नेतृत्वात संघाची घोषणा केली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माही या मालिकेत खेळणार आहेत. तीन सामन्यांची वनडे मालिका विराट कोहलीसाठी खास असणार आहे. कारण या मालिकेत विराट कोहली एक दोन नाही तर दहा विक्रम आपल्या नावावर करण्याची शक्यता आहे. सध्या विराट कोहलीचा फॉर्म पाहता त्याला दहा विक्रम सहज सोपं दिसत आहे. विजय हजारे ट्रॉफीतही विराट कोहलीने आपल्या फॉर्मची झलक दाखवून दिली आहे. हा फॉर्म न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत कायम राहिला तर पहिल्या सामन्यापासूनच विक्रमांची रांग लागेल. पहिला वनडे सामना 11 जानेवारीला वडोदरा, दुसरा वनडे 14 जानेवारीला सामना राजकोट आणि तिसरा वनडे सामना 18 जानेवारीला इंदुरला होणार आहे. चला जाणून घेऊयात कोण कोणते विक्रम आपल्या नावावर करणार ते…

हे दहा विक्रम विराट कोहलीच्या रडारवर

  1. विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत 10 दावा करताच पहिल्या विक्रमाची नोंद करणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध वनडेत मिळालेल्या विजयात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरणार आहे.
  2. न्यूझीलंडविरुद्ध 25 धावांचा पल्ला गाठताच सर्वात वेगाने 28 हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा फलंदाज ठरणार आहे.
  3. 73 धावांची केळी करताना विराट कोहली न्यूझीलंडविरुद्ध 3 हजार धावा करणारा दुसरा आशियाई फलंदाज ठरेल.
  4. विराट कोहलीने या मालिकेत 94 धावांची खेळी करताच. वनडे न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरेल.
  5. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसरं स्थान पटकावण्यासाठी फक्त 42 धावांची गरज आहे. या वनडे मालिकेत त्याचा फॉर्म पाहता सहज शक्य आहे.
  6. विराट कोहलीकडे वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करण्याची संधी आहे. यासाठी त्याला 227 धावांची गरज आहे.
  7. विराट कोहलीने मालिकेत 314 केल्यास न्यूझीलंडविरुद्ध वनडेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरू शकतो.
  8. विराट कोहलीने तीन पैकी एका सामन्यात शतक ठोकल्यास न्यूझीलंडविरूद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारा फलंदाज ठरेल.
  9. न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत 350 धावा करताच विराट कोहली घरच्या मैदानातवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल.
  10. विजयी वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्यासाठी फक्त 128 धावा हव्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील तीन सामन्यात त्याच्याकडे ही संधी आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...