IND vs PAK मॅचआधी फुल सेलिब्रेशन, मेलबर्नमध्ये ‘लुंगी डान्स’ VIDEO व्हायरल

IND vs PAK: कदाचित आता पावसालाही दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांचा (Cricket Fans) उत्साह समजला असेल.

IND vs PAK मॅचआधी फुल सेलिब्रेशन, मेलबर्नमध्ये लुंगी डान्स VIDEO व्हायरल
ind vs pak
Image Credit source: VideoGrab
| Updated on: Oct 23, 2022 | 12:29 PM

मेलबर्न: पुढच्या काही तासात भारत-पाकिस्तानमध्ये (IND vs PAK) हाय-वोल्टेज सामना सुरु होणार आहे. कालपर्यंत पाऊस या सामन्यात खलनायक ठरणार असं वाटत होतं. पण कदाचित आता पावसालाही दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांचा (Cricket Fans) उत्साह समजला असेल. त्यामुळे सामन्याची वेळ जवळ येताच तो सुद्धा गायब झाला आहे. भारत-पाकिस्तान सामना म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी एक मेजवानी असते. आज मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या (MCG) आता आणि बाहेर हेच दृश्य आहे.

मॅच सुरु होण्याआधीच सेलिब्रेशन

सामना सुरु होण्याआधी चाहत्यांच फुल सेलिब्रेशन सुरु आहे. मेलबर्नमध्ये मॅचच्या आधी लुंगी डान्स गाण वाजवलं जात आहे. फॅन्स या गाण्यावर डान्स करताना दिसतायत. टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये भारत-पाकिस्तानच्या टीम्स आज आपली पहिली मॅच खेळणार आहेत.

हवामान अनुकूल

महामुकाबल्यासाठी भारत आणि पाकिस्तान दोन्ही टीम्सनी जोरदार तयारी केली आहे. हवामान सुद्धा सामन्यासाठी अनुकूल आहे. महामुकाबला पाहण्यासाठी क्रिकेट चाहेत मोठ्या संख्येने MCG मध्ये दाखल होत आहेत.

व्हिडिओ व्हायरल

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर जमा होणारी गर्दी आणि सामन्याची वेळ जवळ येत असताना, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये फॅन्स बॉलिवूडच प्रसिद्ध गाणं लुंगी डान्सवर नाचताना दिसतायत. हा व्हिडिओ पाहून मेलबर्नमध्ये सध्या किती उत्साह आहे, ते दिसून येतय.