IND vs PAK : काय करतोय यार? शिवम दुबे रिंकू सिंहवर संतापला, काय झालं?

Shivam Dube Unhappy With Rinku Singh : रिंकु सिंहमुळे शिवम दुबेसोबत जे झालं तसं होणं क्रिकेटमध्ये सामन्य आहे. मात्र रिंकूने शिवमसोबत करायला नको होतं. रिंकूच्या चुकीचा फटका शिवमला बसला. त्यामुळे शिवमने नाराजी व्यक्त केली.

IND vs PAK : काय करतोय यार? शिवम दुबे  रिंकू सिंहवर संतापला, काय झालं?
Shivam Dube Unhappy With Rinku Singh
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 15, 2026 | 11:32 PM

भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत रविवारी 15 फेब्रुवारीला पाकिस्तावर विजय मिळवला. भारताने 176 धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानला 114 धावांवर रोखलं. भारताने अशाप्रकारे हा सामना 61 धावांनी आपल्या नावावर केला. भारताचा हा सलग तिसरा विजय ठरला. भारताने यासह सुपर 8 मध्ये धडक दिली. भारतासाठी इशान किशन याने सर्वाधिक 77 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे भारताला पाकिस्तानसमोर 175 धावांपर्यंत मजल मारता आली. तसेच ऑलराउंडर शिवम दुबे यानेही 27 धावांची छोटेखानी मात्र प्रभावी खेळी साकारली. मात्र या खेळीदरम्यान शिवमचा भडका उडालेला पाहायला मिळाला. शिवम त्याचा सहकारी रिंकु सिंहवर नाराज झाला. शिवमला नक्की शिवमची कोणती गोष्ट खटकली? हे जाणून घेऊयात.

कॅप्टन सूर्युकमार आऊट झाल्याने भारताचा स्कोअर 18.5 ओव्हरमध्ये 5 आऊट 159 असा झाला होता. त्यानंतर शिवम आणि रिंकूने सहाव्या विकेटसाठी 6 बॉलमध्ये 16 रन्स जोडल्या. त्यानंतर शिवम दुबे रन आऊट झाला आणि त्याच्या खेळीचा शेवट झाला. त्यानंतर शिवमचं तापट रुप चाहत्यांना पाहायला मिळालं.

नक्की काय झालं?

शिवम 20 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर स्ट्राईक एन्डवर (विकेटकीपर उभा असतो ती बाजू) रन आऊट झाल. रिंकूच्या चुकीच्या कॉलमुळे शिवम रन आऊट झाला. रिंकूने शाहिन शाह आफ्रिदीच्या बॉलिंगवर फटका मारला. रिंकू-शिवमने 1 धावा घेतली. रिंकूने शिवमला दुसऱ्या धावेसाठी आवाज दिला. मात्र रिंकूने क्षणात नकार दिला. मात्र तोवर शिवमने स्ट्राईक एन्ड सोडला होता. शिवम रिंकूच्या नकारानंतर पुन्हा मागे फिरला. मात्र तोवर पाकिस्तानच्या विकेटकीपरने शिवमला रन आऊट केलं. त्यानंतर शिवमने भर मैदानात नाराजी व्यक्त केली.

शिवम सलग दुसऱ्यांदा रन आऊट

शिवम मैदानात तसा कायम शांत असतो. विनाकारण कुणाला डिवचत नाही, तसंच आपला खेळ खेळत असतो. मात्र रिंकूच्या चुकीच्या कॉलमुळे रन आऊट झाल्याने शिवमचा संताप अनावर झाला. शिवमने रन आऊट झाल्यानंतर रिंकुकडे पाहत नाराजी व्यक्त केली. शिवमच्या नाराजीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान शिवमची रन आऊट होण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली. शिवम गेल्या सामन्यात नामिबिया विरुद्धही रन आऊट झाला होता. योगायोग म्हणजे तेव्हाही रिंकु सिंह नॉन स्ट्राईक एन्डवर (बॉलर बॉलिंग टाकतो ती बाजू) होता.