IND vs SA 3rd Test Cape Town Weather: केपटाऊनमध्येही पाऊस खलनायक बनणार? जाणून घ्या वेदर रिपोर्ट

| Updated on: Jan 10, 2022 | 1:05 PM

जोहान्सबर्ग कसोटीत चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे केपटाऊन हवामान कसे असले? त्याची चर्चा सुरु आहे. 

IND vs SA 3rd Test Cape Town Weather: केपटाऊनमध्येही पाऊस खलनायक बनणार? जाणून घ्या वेदर रिपोर्ट
Photo from Social Media
Follow us on

केपटाऊन: भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना उद्या केपटाऊनच्या न्यूलँडस स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारताने पहिली सेंच्युरियन कसोटी जिंकली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने जोहान्सबर्गची कसोटी जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता मालिकेतील तिसऱ्या निर्णायक कसोटीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण केपटाऊनचा जय-पराजय मालिकेचा निकाल निश्चित करणार आहे. मागच्या दोन कसोटींप्रमाणे या कसोटीवरही पावसाचे सावट आहे. (IND vs SA 3rd Test Cape Town Will rain spoil the game know about Weather report)

पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये पावसाने व्यत्यय आणला होता. सेंच्युरियन कसोटीच्या दुसऱ्यादिवसाच्या खेळावर पावसाने पाणी फिरवले होते, तर जोहान्सबर्ग कसोटीत चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे केपटाऊन हवामान कसे असले? त्याची चर्चा सुरु आहे. हवामानाशी संबंधित अपडेट देणाऱ्या एक्यूवेदर.कॉमनुसार केपटाऊन कसोटीच्या पहिल्या दिवशी ढगाळ हवामान असेल. पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पहिल्या सत्राचा खेळ म्हणजे लंच आधीचा खेळ पावसामुळे वाया जाऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यानंतर आकाश स्वच्छ असेल.

सामन्याचे पाचही दिवस वातावरण कसे असेल?
केपटाऊन कसोटीच्या पहिल्यादिवशी 11जानेवारीला पावसाची शक्यता 64 टक्के आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्यादिवशी पावसाची शक्यता अजिबात नाही. चौथ्यादिवशी 14 जानेवारीला पावसाची शक्यता फक्त एक टक्के आहे. पाचव्यादिवशी 15 जानेवारीला पाऊस कोसळण्याची शक्यता 19 टक्के आहे. त्यामुळे पहिला दिवस सोडल्यास नंतरचे चार दिवस आकाश निरभ्र राहील.

संबंधित बातम्या:

IND vs SA: टीम इंडियाच्या प्लेइंग XI बद्दल महत्त्वाची अपडेट, केपटाऊन टेस्टमध्ये हे दोन मोठे बदल होऊ शकतात
IND vs SA: संघाबाहेर कोण जाणार? कॅप्टन कोहलीसाठी मुंबईकर खेळाडूचा बळी देणार?
Rishabh Pant: ‘खेळाडू मोठा असो वा छोटा, चूक ही चूकच असते’, ऋषभ पंतला पुन्हा सुनावलं

 

(IND vs SA 3rd Test Cape Town Will rain spoil the game know about Weather report)