AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jasprit Bumrah : 3 विकेट्स-2 रेकॉर्ड्स, बुमराहची वर्ल्ड कपमध्ये ऐतिहासिक कामगिरी, चौघांना पछाडलं

Jasprit Bumrah Broke R Ashwin Most T20i World Cup Wickets Record : टीम इंडियाचा प्रमुख आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने 3 विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेचं कंबरडं मोडलं. बुमराहने यासह टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात अविस्मरणीय अशी कामगिरी करुन दाखवली आहे.

Jasprit Bumrah : 3 विकेट्स-2 रेकॉर्ड्स, बुमराहची वर्ल्ड कपमध्ये ऐतिहासिक कामगिरी, चौघांना पछाडलं
Jasprit Bumrah Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Feb 22, 2026 | 11:42 PM
Share

टीम इंडियाची आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 मोहिमेची सुरुवात पराभवाने झाली. टीम इंडियाला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 76 धावांनी पराभूत व्हावं लागलं. भारताला गतउपविजेता दक्षिण आफ्रिकेने पराभवाचं पाणी पाजलं. दक्षिण आफ्रिकेने 188 धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला 111 रन्सवर 7 बॉलआधी ऑलआऊट केलं. दक्षिण आफ्रिकेने यासह या मोहिमेतील सलग पाचवा विजय साकारला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवामुळे टीम इंडियाच्या सेमी फायनलच्या मोहिमेला मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाला आता उपांत्य फेरीत पोहचायंच असेल तर उर्वरित दोन्ही सामन्यांत मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.

टीम इंडियाच्या गोलंदाजांनी या सामन्यात चांगली सुरुवात केली होती. भारताने दक्षिण आफ्रिकेला 20 धावांवर 3 झटके दिले होते. तसेच दक्षिण आफ्रिका 200 पार सहज पोहचेल असं वाटत होतं. मात्र भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 187 धावावंर रोखण्यात यश मिळवलं. यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने प्रमुख योगदान दिलं. बुमराहने 3 विकेट्स मिळवल्या. बुमराहने यासह इतिहास घडवला. बुमराह टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला. बुमराहने याबाबतीत माजी फिरकीपटू आर अश्विन याच्या 32 विकेट्सचा विक्रम मोडीत काढला.

अश्विनचा रेकॉर्ड ब्रेक

बुमराहने अश्विनच्या तुलनेत 2 डावांआधी ही कामगिरी करुन दाखवली आहे. अश्विनने 24 टी 20i सामन्यांमध्ये 17.25 च्या सरासरीने 32 विकेट्स मिळवल्या होत्या. तर बुमराहने 22 सामन्यांमधील 22 व्या डावात 13.36 च्या सरासरीने 33 विकेट्स घेतल्या. बुमराहने दक्षिण आफ्रिकेच्या कॉर्बिन बॉश याला आऊट करत टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील आपली 33 वी विकेट मिळवली.

बुमराहची चिवट गोलंदाजी

जसप्रीत बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 ओव्हरमध्ये टीम इंडियाकडून सर्वात कमी धावा देणारा गोलंदाज ठरला. बुमराहने 3.80 च्या इकॉनमीने 15 धावा देत दक्षिण आफ्रिकेच्या 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

बुमराहने यासह आणखी एक विक्रम केला. बुमराहची टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत 4 ओव्हर पूर्ण केल्यानंतर सर्वाधिक 15 किंवा त्यापेक्षा कमी धावा देण्याची ही पाचवी वेळ ठरली. बुमराहने यासह अंजता मेंडीस, सॅम्युअल बद्री आणि टीम साऊथी यांना मागे टाकलं आहे. या तिघांनी प्रत्येकी 4-4 वेळा कोट्यातील 4 ओव्हर संपवल्यानंतर 15 किंवा त्यापेक्षा कमी धावा दिल्या होत्या.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...