
मुंबई: टीम इंडियाने नव्या वर्षाची सुरुवात विजयाने केली आहे. काल श्रीलंकेविरुद्ध पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगला होता. अवघ्या 2 धावांच्या निसटत्या फरकाने टीम इंडियाने विजय मिळवला. पर्दापणाच्या पहिल्याच डेब्यु मॅचमध्ये शिवम मावी चमकला. त्याने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात कमाल केली. शिवम मावीने पहिल्या मॅचमध्ये चार विकेट काढल्या. टीमच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
…म्हणून लग्जरी लाइफ स्टाइल जगतो
मावीन भले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता डेब्यु केला असेल. पण तो बऱ्याच काळापासून आयपीएलमध्ये खेळतोय. आयपीएल आणि ब्रँड एंडोर्समेंटमुळे शिवम मावी भरपूर पैसा कमावते. त्यामुळे लग्जरी लाइफ स्टाइलला त्याची पसंती आहे.
इतके कोटी रुपये नेटवर्थ
शिवम मावीच्या नेटवर्थबद्दल अचूक आकडे उपलब्ध नाहीयत. पण काही मीडिया रिपोर्ट्समध्ये मावीची नेटवर्थ 40 कोटी रुपयांच्या घरात असल्याचा दावा करण्यात आलाय.
KKR ने मागच्या सीजनमध्ये त्याच्यासाठी किती खर्च केले?
मावीने सर्वाधिक पैसा आयपीएलमधून कमावलाय. 2018 साली केकेआरने शिवम मावीला 3 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. मागच्यावर्षी मेगा ऑक्शनमध्ये केकेआरने या गोलंदाजावर 7.25 कोटी रुपये खर्च केले. यंदाचा सीजन तो गुजरात टायटन्सकडून खेळणार आहे. गुजरात या सीजनसाठी त्याला 6 कोटी रुपये देईल. त्याशिवाय इंडिया ए कडून खेळण्यासाठी त्याला मॅच फी मिळते.
शिवम मावीकडे कुठल्या कार?
गाड्याबद्दल बोलायच झाल्यास, शिवम मावीकडे ऑडी A5 कार आहे. त्याशिवाय BMW कार सुद्धा विकत घेतलीय. शिवम मावी काही ब्रांडस सुद्धा एंडॉर्स करतो.