
कोलंबो | पाकिस्तान क्रिकेट टीमचा 228 धावांनी धुव्वा उडवल्यानंतर टीम इंडिया आता श्रीलंकेचा विजयरथ रोखण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया आशिया कप 2023 मधील आपला दुसरा सामना हा श्रीलंका विरुद्ध 12 सप्टेंबर रोजी खेळणार आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे. पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील मुख्य दिवसातील (10 सप्टेंबर) सामना हा रद्द झाला. त्यामुळे सामना दुसऱ्या म्हणजेच राखीव दिवशी (11 सप्टेंबर) निकाली निघाला. त्यामुळे आता टीम इंडिया श्रीलंका विरुद्ध मैदानात उतरताच सलग 3 दिवस मॅच खेलणारी टीम ठरेल. दरम्यान टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका या सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सुपर 3 मधील सामना हा मंगळवारी 12 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सामन्याचं आयोजन हे कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये करण्यात आलंय.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना टीव्हीवर डीडी स्पोर्ट्सवर फुकटात पाहता येईल. तसेच स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरही सामन्याचा आनंद घेता येईल.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामना मोबाईलवरही फ्री पाहता येईल. हॉटस्टार ॲपवर सामना मोफत पाहायला मिळेल.
आशिया कपसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, के.एल.राहुल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकुर, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा.
श्रीलंका क्रिकेट टीम
दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), पाथुम निसानाका, दिमुथ करुणारत्ने, कुसल जेनिथ परेरा, चैरिथ असलांका, धनंजय डी सिल्वा, मथीशा पथिराना, सदीरा समरविक्रमा, महीश थीक्षाना, डुनिथ वेललागे, कासुन राजिथा, दुशान हेमंथा , बिनुरा फर्नांडो आणि प्रमोद मदुशन.