
कोलंबो | पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर आता आशिया कप 2023 सुपर 4 मधील सामन्यात टीम इंडियासमोर श्रीलंकेचं आव्हान आहे. टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामना हा कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने या सामन्यात टॉस जिंकला आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. आर प्रेमदासा स्टेडियमची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल आहे. त्यामुळे टीम इंडियात एक अतिरिक्त फिरकी गोलंदाजाला संधी देण्यात आली आहे.
श्रीलंका विरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल करण्यात आला आहे. मुंबईकर शार्दुल ठाकुर याच्या जागी फिरकी गोलंदाज अक्षर पटेल याचा समावेश करण्यात आला आहे. कुलदीपने पाकिस्तान विरुद्ध 11 सप्टेंबरला 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्यावरुन ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी मदतशीर असल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे प्लेईंग ईलेव्हनमध्ये अतिरिक्त गोलंदाज म्हणून अक्षरला संधी देण्यात आली आहे. तर श्रीलंका क्रिकेट टीमने आपल्या त्याच 11 जणांवर विश्वास दाखवला आहे. त्यांनी कोणताही बदल केलेला नाही.
टीम इंडियाने टॉस जिंकला
Match Day!
📍 Colombo
🏟️ India 🆚 Sri Lanka
🤝 Super 4⃣s
💻 https://t.co/Z3MPyeL1t7 #TeamIndia | #AsiaCup2023 | #INDvSL pic.twitter.com/l1sSxGAFTX
— BCCI (@BCCI) September 12, 2023
दरम्यान टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध 11 सप्टेंबर रोजी राखीव दिवशी 228 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यामुळे टीम इंडियाच्या नेट रनरेटमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे आता श्रीलंका विरुद्ध विजय मिळवल्यास टीम इंडिया थेट आशिया कप 2023 च्या अंतिम फेरीत पोहचेल. मात्र श्रीलंका आपल्या घरच्या मैदानात खेळतेय. त्यामुळे टीम इंडियासमोर लंका टायगर्सचं कडवं आव्हान असणार आहे.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा आणि मथीशा पाथिराना.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.