
मुंबई : भारत आणि श्रालंकेमध्ये सुपर 4 मधील चौथा सामना रंगणार आहे. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारताने ऐतिहासिक विजय मिळवला होता. भारतीय खेळाडू सलग दोन दिवस मैदानात उतरून आज तिसऱ्या दिवशीसुद्धा सामना खेळणार आहेत. आशिया कपच्या फायनलमध्ये धडक मारण्यासाठी श्रीलंकेविरूद्धचा सामना भारताला जिंकावा लागणार आहे. आज होणाऱ्या सामन्यामध्ये रोहित शर्मा प्लेइंग 11 मध्ये काही बदल करू शकतो. यामध्ये सूर्यकुमार यादव याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळू शकतं. दोन मुंबईकर खेळाडूंची संघात एन्ट्री होऊ शकते.
भारतीय संघामध्ये कमबॅक करणारे के. एल.राहुल, जसप्रीत बुमराह यांना आराम दिला जावू शकतो. के.एल. राहुल याने शतकी खेळी केला त्यासोबतच संपूर्ण सामन्यामध्ये कीपिंगसुद्धा केली. दुखापतीमधून आल्यानंतर त्याने शतक आणि केलेली फिल्डिंग यामुळे त्याला परत काही त्रास जाणवायला नको. याची खबरदारी म्हणून टीम व्यवस्थापन त्याला आरामासाठी बाहेर बसवू शकतं. त्याच्या जागी ईशान किशन तर श्रेयस अय्यरच्या जागी स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
जसप्रीत बुमराह याच्य जागी परत एकदा मोहम्मद शमीला संधी दिली जावू शकते. मात्र आजच्या सामन्यावर पावसाचं सावट आहे, पाकिस्तानचा सामना पूर्ण व्हायला दोन दिवस लागले त्यामुळे भारत-श्रीलंका सामन्यामध्ये पाऊस खोडा घालू शकतो.
भारतीय संघ: रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (W), इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल , श्रेयस अय्यर, प्रसीध कृष्णा, टिळक वर्मा
श्रीलंकेचा संघ: पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (W), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शानाका(C), दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा, मथीशाल पेथिराना, कुसल पेथिराना, बी. प्रमोद मदुशन, दुषण हेमंथा