
कुलदीप यादव हा भारतीय क्रिकेट संघातील आता विश्वासाचा फिरकीपटू ठरला आहे. जेव्हा विकेट मिळत नाही तेव्हा हमखास विकेट घेऊ शकतो अशी त्याची छबी तयार झाली आहे. कुलदीप यादवने आशिया कप स्पर्धेत आपल्या कर्तृत्वाने हे सिद्ध करून दाखवलं आहे. आता कुलदीप यादव वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी आपल्या गोलंदाजीची करामत दाखवत आहे. यावेळी त्याने आपल्या फिरकीच्या जाळ्यात वेस्ट इंडिजच्या दोन फलंदाजांना गुंतवलं. यावेळी वेस्ट इंडिजच्या फॉर्मात असलेल्या शाई होपचा क्लिन बोल्ड केले. कुलदीप यादवने टाकलेल्या चेंडूचा शे होपकडे काहीच उत्तर नव्हतं. कुलदीप यादवने टाकलेल्या या चेंडूची तुलना आता शेन वॉर्नशी केली जात आहे. कुलदीप यादवने हा मॅजिक बॉल संघाच्या 24व्या षटकात टाकला. त्याने टाकलेल्या चेंडूची आता सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
कर्णधार शुबमन गिल याने संघाचं 24वं षटक कुलदीप यादवकडे सोपवलं. या षटकाच्या दुसऱ्या चेंडू शाई होपला कळलाच नाही. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पडला आणि इतक्या वेगाने टर्न झाला की स्टंप घेऊन गेला. होपला वाटलं की तो सहज या चेंडूवर ड्राईव्ह करेल. पण तसं झालं नाही. त्याने बॅट तर फिरवली पण चेंडू स्टंप घेऊन गेला. कुलदीपच्या हा चेंडू पाहून शाई होप आवाक् झाला. त्याचा अवघ्या 26 धावांवर आटोपला.
Welcome back to Test cricket, @imkuldeep18! 💙
His first Test since October 2024 & Kuldeep cleans up Shai Hope just before Lunch! ☝
🍽 LUNCH | WI 90/5 (23.2)
Catch the LIVE action ➡ https://t.co/Ju76dqhTdq #INDvWI 1st Test, Day 1 👉 LIVE NOW on Star Sports & JioHotstar pic.twitter.com/Qc7e3CIIis
— Star Sports (@StarSportsIndia) October 2, 2025
कुलदीप यादवने 347 दिवसानंतर कसोटी क्रिकेटच्या प्लेइंग 11 मध्ये जागा मिळवली आहे. .यापूर्वी इंग्लंड दौऱ्यातही टीम इंडियासोबत गेला होता. पण पाचही सामने त्याला बेंचवर बसून पाहावे लागले. पण कुलदीप यादव योग्य संधीच्या प्रतीक्षेत होता. आशिया कप स्पर्धेत त्याला संधीचं सोनं करण्यास मिळालं. त्याने या स्पर्धेत 17 विकेट घेतल्या आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीसाठी विचार करणं भाग पाडलं. वेस्ट इंडिज विरूद्धच्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात कुलदीप यादवे 6.1 षटक टाकत 25 धावा देत 2 गडी बाद केले.