
टीम इंडियामध्ये खेळण्याचं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न पूर्ण होत नाही. मात्र जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर तुम्ही कोणतेही लक्ष्य साधू शकता. अशातच वेस्ट इंडिजविरूद्धच्या टी-20 दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये दोन युवा खेळाडूंची निवड झाली आहे. त्यातील एक खेळाडू असा ज्याला टीम इंडियाचा भावी युवराज सिंग म्हणून पाहिलं जात आहे.

वेस्ट इंडिजविरूद्धच्या टी-20 मालिकेसाठी बीसीसीआयने युवा खेळाडूंना संधी दिली आहे. या संघामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी या मोठ्या खेळाडूंना विश्रांती दिली आहे.

टीम इंडियामध्ये पहिल्यांदा यशस्वी जयस्वाल आणि तिलक वर्मा या दोन खेळाडूंची निवड झाली आहे. यामधील एका मुंबईचा स्टार फलंदाज तिलक वर्मा याने निवड झाल्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मी रोज रात्री झोपेत विचार करत असतो की मला कशा प्रकारे बॅटींग करायची आहे. संघाची धावसंख्या 40 किंवा 50 आणि 5 विकेट्स गेलेल्या असताना तिथून संघाला कसं मजबूत स्थितीत न्यायचं याबाबत मी विचार करत असल्याचं तिलक वर्माने सांगितलं.

तिलक वर्मा याने मुंबई इंडियन्सविरूद्ध 38.95 च्या सरासरीने 740 धावा केल्या आहेत. त्याच्याकडे हिटिंग पॉवर असून खडे-खडे सिक्सर मारण्याची क्षमता आहे.