Video : रवि बिश्नोईचा कॅच बघितला नाही का? जॉन्टी रोड्सची येईल आठवण

झिम्बाब्वेविरुद्ध तिसरा टी20 सामना जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. भारताने झिम्बाब्वेला 23 धावांनी पराभूत केलं. यात शुबमन गिलची खेळी आणि वॉशिंग्टन सुंदरचा स्पेल महत्त्वाचा ठरला. पण रवि बिश्नोईने घेतलेला झेलही कौतुकाचा विषय ठरला आहे. त्याने घेतलेल्या झेलचं कौतुक होत आहे. नेटकऱ्यांना या निमित्ताने जॉन्टी रोड्सची आठवण झाली.

Video : रवि बिश्नोईचा कॅच बघितला नाही का? जॉन्टी रोड्सची येईल आठवण
Image Credit source: AFP
| Updated on: Jul 10, 2024 | 9:30 PM

भारतीय संघ टी20 मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर टीम इंडिया पुन्हा एकदा विजयाच्या ट्रॅकवर आली आहे. तिसरा सामना जिंकून टीम इंडियाने 2-1 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागला. भारताने 20 षटकात 4 गडी गमवून 182 धावा केल्या आणि विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं. यात शुबमन गिलने 49 चेंडूत 66 धावा आणि ऋतुराज गायकवाडने केलेल्या 49 धावा महत्त्वाच्या ठरल्या. विजयी धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने 20 षटकात 6 गडी गमवून 159 धावा केल्या. मात्र 23 धावा तोकड्या पडल्या आणि पराभवाला सामोरं जावं लागलं. या सामन्यात भारताचे सर्वच पैलू दिसून आले. क्षेत्ररक्षणातही टीम इंडियाने कमाल केली. भारताचा फिरकीपटू रवि बिश्नोई याने जबरदस्त झेल घेतला. त्याच्या या झेलचं सर्वत्र कौतुक होत आहे. रवि बिष्णोई गोलंदाजीबरोबर फिल्डिंगमध्ये उजवा आहे. त्यामुळेच कर्णधार शुबमन गिलने त्याला बॅकफूट प्वॉइंटवर उभं केलं होतं.

शुबमन गिलने चौथं षटक आवेश खानच्या हाती सोपवलं आणि त्याने चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. चेंडू मारण्यासाठी बऱ्यापैकी रूम मिळाल्याने बॅनेट जोरदार प्रहार केला. बॅकफूट प्वॉइंटच्या डोक्यावरुन जाईल असं वाटलं होतं. इतक्या वेगाने हा प्रहार होता की चेंडू गोळीसारखा निघाला होता. पण बिश्नोईच्या तीक्ष्ण नजरेने चेंडू बरोबर हेरला आणि अप्रतिम झेल पकडला. असेच झेल दक्षिण अफ्रिकेचा जॉन्टी रोड्स घेत असे. विशेष म्हणजे रवि बिश्नोई हा आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून खेळतो आणि या संघाचा फिल्डिंग कोच जॉन्टी रोड्स आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद.

झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): तादिवानाशे मारुमणी, वेस्ली मधवेरे, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), जॉनथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), वेलिंग्टन मसाकादझा, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा.