IND W vs SA W : दुसऱ्या टी-20 मध्ये भारताने जिंकला टॉस, पाहा प्लेइंग 11 कोण-कोण?

IND W vs SA W 2nd T20 : महिला भारत आणि महिला दक्षिण आफ्रिका संघामधील दुसरा टी-20 सामना सुरू झाला आहे. करो या मरो सामन्यामध्ये भारताची कॅप्टन हरमनप्रीत कौरने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

IND W vs SA W : दुसऱ्या टी-20 मध्ये भारताने जिंकला टॉस, पाहा प्लेइंग 11 कोण-कोण?
| Updated on: Jul 09, 2024 | 7:49 PM

महिला भारत आणि महिला दक्षिण आफ्रिका संघांमध्ये तिसरा टी-20 सामना होत आहे. हा सामना चेन्नईमधील चिदंबरम स्टेडियमवर होत आहे. भारती महिला संघाची कॅप्टन हरमनप्रीत कौर हिने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. भारतासाठी ‘करो या मरो’ असा सामना असणार आहे. कारण पहिल्या टी-20 सामन्यात महिला भारतीय संघाचा पराभव झाला होता. आज पराभव झाला तर मालिका गमावावी लागणार आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचा 12 धावांनी पराभव झाला होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने पहिल्यांदा बटींग करताना २० ओव्हरमध्ये 189-4 धावा केल्या होत्या. ताजमिन ब्रिट्स हिने सर्वाधिक 81 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. या धावसंख्येचा पाठलाग करताना महिला भारतीय संघाला 20 ओव्हरमध्ये 177-4 धावाच करता आल्या होत्या. स्मृती मंधाना हिनेसुद्धा 46धावा केल्या होत्या. तर जेमिमाह रॉड्रिग्जने नाबाद 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र ती संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.

 

भारताची प्लेइंग इलेव्हन: शेफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, उमा छेत्री (यष्टीरक्षक), एस सजना, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, अरविंद पाटील, अरविंद राधा यादव.

दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन: लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), ताजमिन ब्रिट्स, मारिझान कॅप, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, ॲनेके बॉश, ॲने डेर्कसेन, एलिस-मेरी मार्क्स, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको मलाबा.