AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: टीम इंडियाचं मँचेस्टरमध्ये जिंकणंही कठीण? अजिंक्य रहाणेने एक उणीव केली उघड

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये खेळला जाणार आहे. हा सामना भारतासाठी करो या मरोची लढाई आहे. 23 जुलैपासून हा सामना सुरु होईल. तत्पूर्वी अजिंक्य रहाणे यांने टीम इंडियाची कमकुवत बाजू उघड केली आहे.

IND vs ENG: टीम इंडियाचं मँचेस्टरमध्ये जिंकणंही कठीण? अजिंक्य रहाणेने एक उणीव केली उघड
IND vs ENG: टीम इंडियाचं मँचेस्टरमध्ये जिंकणंही कठीण? अजिंक्य रहाणेने एक उणीव केली उघडImage Credit source: PTI
| Updated on: Jul 18, 2025 | 7:47 PM
Share

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिका आता निर्णायक वळणावर पोहोचली आहे. इंग्लंडने आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात 2-1 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतावरचा दबाव वाढला आहे. त्यामुळे मालिका वाचवायची असेल तर चौथा सामना भारताला काहीही करून जिंकावाच लागेल. अन्यथा मालिका हातून जाईल तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेतही मोठं नुकसान होईल. त्यामुळे हा सामना भारतासाठी खूपच महत्त्वाच आहे. या सामन्यापूर्वी अजिंक्य रहाणे याने एक कमकुवत बाजू मांडली आहे. यामुळे टीम इंडियाचं नुकसान होऊ शकतं. अजिंक्य रहाणे याने सांगितलं की, जर टीम इंडियाला हा सामना जिंकायचा असेल तर एक अतिरिक्त गोलंदाज घ्यावा लागेल. कारण गोलंदाजच तुम्हाला कसोटी मालिका आणि कसोटी सामने जिंकवतात, असं अजिंक्य रहाणेने सांगितलं.

अजिंक्य रहाणे याने सांगितलं की…

अजिंक्य रहाणे याने त्याच्या युट्यूब चॅनेलवर सांगितलं की, ‘आपल्याला सर्वांना माहिती आहे की, चौथा आणि पाचवा दिवस फलंदाजीसाठी कठीण असतो. या दिवशी धावा करणे सोपं नसते. इंग्लंडने चांगली गोलंदाजी केली. पण मला वाटते की लॉर्ड्सवरील पहिल्या डावात भारतीय संघ जास्त धावा करू शकली असती. जर मी ते पुढे नेले तर टीम इंडियाने संघात एक अतिरिक्त गोलंदाज जोडावा कारण गोलंदाज कसोटी सामने आणि मालिका जिंकतात. तुम्ही हे फक्त 20 विकेट्स घेऊन करू शकता.’

कुलदीप यादवला मँचेस्टरमध्ये संधी मिळेल का?

अजिंक्य रहाणे याच्या सूचनेनंतर भारतीय संघात एका अतिरिक्त गोलंदाजाला संधी मिळेल का? हे नाणेफेकीचा कौल झाल्यानंतरच स्पष्ट होईल. कुलदीप यादवला संधी मिळेल की नाही? याबाबत चर्चा आहे. पण इंग्लंडमधून येणाऱ्या अहवालांनुसार, टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फार काही बदल केला जाणार नाही. फक्त एकच बदल होऊ शकतो यात करुण नायरला वगळून ध्रुव जुरेलला संधी मिळू शकते. कारण पंत हा काही विकेटकिपिंग करू शकत नाही. त्यामुळे जुरेल विकेटकीपिंग करू शकतो. तसेच कुलदीपला संधी मिळाली तर ती फक्त वॉशिंग्टन सुंदरच्या जागी संघात येईल.

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.