IND vs AUS 3rd ODI : अभ्यास स्टार्कचा अन् पेपर तिसऱ्याचाच, भारताच्या पराभवाचा ‘हा’ खेळाडू खरा ‘व्हिलन’

IND vs AUS 3rd ODI : भारतीय संघाकडून सुरूवातीला शुबमन गिलच्या अनुपस्थितीत वॉशिंग्टन सुंदर याला संधी देण्यात आली होती. या सामन्यामध्ये हिटमॅनने सुरूवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत कांगारूंच्या गोलंदाजांची खरडपट्टी केली. त्यानंतर एकट्या खेळाडूने भारताचा पराभव केला.

IND vs AUS 3rd ODI : अभ्यास स्टार्कचा अन् पेपर तिसऱ्याचाच, भारताच्या पराभवाचा हा खेळाडू खरा व्हिलन
| Updated on: Sep 27, 2023 | 10:47 PM

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या सामन्यामध्ये कांगारूंनी विजय मिळवला आहे. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 352 धावा केल्या होत्या. कांगारूंनी दिलेल्य आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव 286 धावांवर आटोपला. या सामन्यामध्ये भारतीय संघाच्या फलंदाजीला ग्लेन मॅक्सवेलने सुरूंग लावत सामन्यावर पूर्ण पकडून दिली. ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक ४ विकेट्स घेत विक्रम आपल्या नावावर केला आहे.

मॅक्सवेल चांगलाच नडला

भारतीय संघाकडून सुरूवातीला शुबमन गिलच्या अनुपस्थितीत वॉशिंग्टन सुंदर याला संधी देण्यात आली होती. रोहित शर्माची या मालिकेमधील पहिलीच मॅच होती, हिटमॅनने सुरूवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत कांगारूंच्या गोलंदाजांची खरडपट्टी केली. गड्याने 31 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं, यामध्ये त्याने 5 सिक्सर मारले होते. कागारूंचा कोणताच बॉलर चालला नव्हता शेवटी कमिन्सने ग्लेन मॅक्सवेल याला बोलावलं.

ग्लेन मॅक्सवेल याने 74 धावांवर भारताचा पहिला गडी बाद केला. वॉशिंग्टनने सुंदरला 18 धावांवर आऊट केलं. त्यानंतर रोहित शर्मा-विराट कोहली मैदानात परत एक चांगली भागीदारी रचत होते, यांचीही जोडी मॅक्सवेलने तोडली. रोहितही समोर जोरात फटका खेळायला गेला आणि बॉल मॅक्सवेलच्या हातात जावून बसला. रोहित आऊट झाल्यावर विराटही मॅक्सवेलच्या जाळ्यात अडकला. तीन महत्त्वाच्या विकेट गेल्यावर भारत बॅकफूटला गेला होता.

पाहा व्हिडीओ

 

मैदानात असलेल्या श्रेयस अय्यर याने डावाची सूत्र आपल्या हातात घेत एक बाजू लावून धरत होता. मॅक्सवेलने अय्यरलाही आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत त्याला बोल्ड केलं. या महत्त्वाच्या चार विकेट्स गेल्यावर भारताच्या एकाही फलंदाजाने झुंज दिली नाही. रविंद्र जडेजा मैदानात होता मात्र त्यालाही फार काही चमकदार कामगिरी करता आली नाही.

दरम्यान, मॅक्सवेल याने महत्त्वाच्या चार विकेट्स घेत मोठा विक्रम नावावर केला आहे. वन डे मध्ये भारताविरूद्ध सर्वोत्तम कामगिरी केली. मॅक्सवेलने 40 धावा देत 4 विकेट्स घेत शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्धा कृष्णा

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स कॅरी (w), ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, पॅट कमिन्स (c), मिचेल स्टार्क, तनवीर संघा, जोश हेझलवूड