‘आधी गुगल चेक कर…’, ‘त्या’ प्रश्नावर जसप्रीत बुमराहनं दिलं असं उत्तर, रिपोर्टरची बोलतीच बंद, पहा Video

तिसऱ्या कसोटी सामन्यात देखील भारतीय फलंदाजी ढेपाळली, या सामन्यात ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 445 धावा केल्या, त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाला पुन्हा एकदा खराब खेळीचा फटका बसला.

आधी गुगल चेक कर..., त्या प्रश्नावर जसप्रीत बुमराहनं दिलं असं उत्तर, रिपोर्टरची बोलतीच बंद, पहा Video
| Updated on: Dec 16, 2024 | 9:20 PM

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियानं धमाकेदार सुरुवात केली होती, हा सामना मोठ्या फरकानं टीम इंडियानं आपल्या खिशात घातला. मात्र दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना कारवा लागला.पर्थमध्ये पहिल्या सामन्यात भरतानं विजय मिळवला होता, मात्र त्यानंतर टीम ऑस्ट्रेलियानं जोरदार पुनरागमन केलं. एडिलेडमध्ये भारताचा पराभव झाला, आणि सध्या सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात देखील भारत पराभवाच्या छायेत आहे. बॉर्डर गावस्कर मालिकेमध्ये भारताचा स्टार गोलंदाज बुमराह वगळता इतर कोणत्याही खेळाडूला आपल्या लौकीकाला साजेशी खेळी करता आलेली नाहीये. याच सामन्यादरम्यान बुमराहला एका रिपोर्टने एक प्रश्न विचारला,त्या प्रश्नाचं उत्तर ऐकूण रिपोर्टरची बोलती बंद झाली.हा प्रश्न टीम इंडियाच्या फलंदाजी संदर्भात होता.

तिसऱ्या कसोटी सामन्यात देखील भारतीय फलंदाजी ढेपाळली, या सामन्यात ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 445 धावा केल्या, त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाला पुन्हा एकदा खराब खेळीचा फटका बसला. भारतानं अवघ्या 51 धावांमध्ये चार गडी गमावले त्यानंतर पत्रकार परिषदेसाठी आलेल्या जसप्रीत बुमराहाला एका पत्रकाराने फलंदाजीसंदर्भात प्रश्न विचारला, तेव्हा बुमराहने म्हटलं की मी या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी योग्य व्यक्ती नाहीये, मात्र त्यानंतर त्या पत्रकाराची फिरकी घेताना बुमराहने असं देखील म्हटलं की तुमचा प्रश्न खूपच इंटरेस्टिंग आहे, तुम्ही माझ्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहात, पण एकदा गुगलवर जाऊन चेक करा आणि पाहा कसोटी सामन्याच्या एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे ते. बुमहराच्या या उत्तरावर सर्व जण खळखळून हासले.

 

कसोटी सामन्यात एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचं रेकॉर्ड हे जसप्रीत बुमराहाच्या नावावर आहे, त्याने 2022 मध्ये इंग्लंडविरोधात खेळताना एका षटकात 29 धावा केल्या होत्या. आजही त्याचा तो रेकॉर्ड कायम आहे. कोणत्याही फलंदाजाला ते रेकॉर्ड तोडता आलेलं नाहीये. बुमराहाच्या या उत्तरावर त्या रिपोर्टला देखील हसू आवरता आलं नाही. आता सध्या सुरू असलेला कसोटी सामना जिंकण्याचं मोठं आव्हान टीम इंडिया पुढे असणार आहे.