
इंदूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना हा होळकर स्टेडियममध्ये पार पडला. टीम इंडियाने या सामन्यात ऑस्ट्रेलियावर डीएसनुसार 99 धावांनी मात केली. टीम इंडियाचा या मालिकेतील सलग दुसरा विजय ठरला. टीम इंडियाने या विजयासह 2-0 अशा फरकाने वनडे सीरिज जिंकली. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 399 धावा केल्या. मात्र दुसऱ्या डावात पाऊस आल्याने काही षटकांचा खेळ वाया गेला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 33 ओव्हरमध्ये 317 धावाचं नवं आव्हान मिळालं. मात्र टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचं 217 धावांवर पॅकअप केलं.
इंदूर | रवींद्र जडेजा याने सिन एबोट याला 54 धावांवर आऊट केलं. ऑस्ट्रेलियाचा यासह डाव 217 धावांवर आटोपला. टीम इंडियाने यासह हा सामना डीएलएसनुसार 99 धावांनी जिंकला. तसेच टीम इंडियाने 2-0 अशा फरकाने मालिका जिंकली.
इंदूर | ऑस्ट्रेलियाला आठवा झटका लागला आहे. रवींद्र जडेजा याने एडम झॅम्पा याला 5 धावांवर क्लिन बोल्ड केलं.
इंदूर | विकेटकीपर ईशान किशन याने केलेल्या अचूक थ्रोमुळे ऑस्ट्रेलियाला सातवा झटका लागला आहे. ईशानच्या अचूक थ्रोने सुस्तावलेल्या कॅमरुन ग्रीन याला 17 धावांवर रन आऊट केलंय.
इंदूर | ऑस्ट्रेलियाने सहावी विकेट गमावली आहे. रविंद्र जडेजा याने एलेक्स कॅरी याला बोल्ड केलंय. कॅरीने 14 धावा केल्या.
इंदूर | आर अश्विन याने ऑस्ट्रेलियाला पाचवा झटका दिला आहे. अश्विनने जोस इंग्लिसला 6धावांवर एलबीडब्ल्यू आऊट केलं.
इंदूर | आर अश्विनने मोठी शिकार केली आहे. अश्विनने 52 धावांवर खेळणाऱ्या डेव्हिड वॉर्नर याला एलबीडब्ल्यू आऊट केल आहे.
इंदूर | आर अश्विन याने पहिली विकेट घेत कांगारुंना तिसरा झटका दिला आहे. अश्विनने मार्नश लबुशेन याला 27 धावांवर क्लिन बोल्ड केलं.
इंदूर | दुसऱ्या सामन्यात पावसाने खोडा घातला. तब्बल दीड तांसापेक्षा अधिक वेळ पावसामुळे वाया गेला. त्यानंतर अखेर 8 वाजून 35 मिनिटांनी खेळाला सुरुवात झाली. वेळ वाया गेल्याने सामन्यातील ओव्हर कमी करण्यात आल्या आहेत. डीएलएसनुसार ऑस्ट्रेलियाला 33 ओव्हरमध्ये 317 धावांचं सुधारित आव्हान मिळालं आहे.
इंदूर | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पावसाने दुसऱ्यांदा एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे आता खेळ थांबवण्यात आला आहे.
इंदूर | प्रसिध कृष्णा याने आपल्या स्पेलमधील पहिल्याच ओव्हरमध्ये आणि ऑस्ट्रेलियाच्या डावातील दुसऱ्याच ओव्हरमध्ये 2 झटके दिले. प्रसिधने पहिल्यांदा मॅथ्यू शॉट आणि त्यानंतर स्टीव्ह स्मिथ याला आऊट केलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची 2 बाद 9 अशी स्थिती झाली.
इंदूर | ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. डेव्हिड वॉर्नर आणि शॉर्ट सलामी जोडी मैदानात आली आहे. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 400 धावांचं आव्हान देण्यात आलं आहे.
इंदूर | श्रेयस अय्यर-शुबमन गिल या दोघांनी केलेली द्विशतकी भागीदारी आणि अखेरीस सूर्यकुमार यादव याने दिलेल्या फिनिशिंग टचच्या जोरावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला राउंड फिगर 400 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने 5 विकेट्स गमावून 50 ओव्हरमध्ये 399 धावा केल्या. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यर याने सर्वाधिक 105 धावा केल्या. शुबमन गिल याने 104 धावांची शतकी खेळी केली. कॅप्टन केएल राहुल याने 52 धावा केल्या. ईशान किशन याने 31 धावांचं योगदान दिलं. जडेजा 13 धावांवर नाबाद परतला. तर सूर्यकुमार यादव याने 72 धावांची वादळी खेळी केली.
सूर्यकुमार यादव याने ४४ व्या ओव्हरमध्ये सलग चार सिक्सर मारत कांगारूंची परीक्षा घेतली. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची आता खरी कसोटी असलेली पाहायला मिळणार आहे.
इशान किशन आणि केएल राहुल देखील ऑस्ट्रेलियन बॉलर्सवर जोरदार आक्रमण करत आहेत. दोघांनी 25 चेंडूत 46 धावांची भागीदारी आहे. इशान किशन 14 चेंडूत 23 आणि केएल राहुल 22 चेंडूत 38 धावांवर खेळत आहे.
भारताची तिसरी विकेट गेली असून शतकवीर शुबमन गिल आऊट झाला आहे. 104 धावांवर गिल मोठा फटका खेळण्याच्या नादात कॅचआऊट झाला.
भारताचा सलामीवीर शुबमन गिल याने 92 बॉलमध्ये आपलं शतक पूर्ण केलं आहे. इंदूरमधील दुसरं शतक गिलने पूर्ण केलंय. गिल याने सहा चौकार तर चार सिक्सर मारलं आहे.
श्रेयस अय्यर याने अवघ्या 86 बॉलमध्ये आपलं तिसरं शतक पूर्ण करत जोरदार कमबॅक केलं. या खेळीमध्ये त्याने 10 चौकार आणि 3 षटकार मारले. मोठा फटका खेळण्याच्या नादात शतक झाल्यावर 105 धावांवर अय्यर कॅच आऊट झाला. के. एल. राहुल मैदानात उतरला आहे.
शुबनल गिल पाठोपाठ श्रेयस अय्यरनेही कडक सिक्सर मारत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. 42 बॉलमध्ये त्याने 53 धावा केल्या असून त्यामध्ये त्याने 7 चौकार आणि 1 षटकार मारला आहे.
शुबमन गिल याने कांगारूंना झोडपून काढलं आहे. 43 बॉलमध्ये 60 धावांवर नाबाद असून 3 चौकार आणि 4 षटकार मारले आहेत.
इंदूर | पावसाने जोरदार बॅटिंग केल्यानंतर विश्रांती घेतली आहे. त्यामुळे टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया सामन्याला पुन्हा दुपारी 2 वाजून 55 मिनिटांनी सुरुवात झाली आहे. पावसामुळे 2 वाजून 15 मिनिटांनी खेळ थांबवण्यात आला होता
इंदूरमध्ये सुरू असलेल्या भारतृऑस्ट्रेलिया दुसऱ्या वन डे सामन्यामध्ये पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आहे. 9.5 ओव्हरमध्ये ७९ धावा झाल्या असून गिल 32 आणि श्रेयस 34 धावांवर नाबाद आहे.
भारतीय संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड 8 धावांवर आऊट झाला आहे. चौथ्या ओव्हरमध्येस त्याला जोश हजलवूडने माघारी धाडलं. श्रेयस अय्यर मैदानात उतरला असून गिल दुसऱ्या बाजूने आहे.
भारताचे सलामीवीर शुबमन गिल आणि ऋतुराज गायकवाड दोघे मैदानात उतरले आहेत. गायकवाड याने चौकार मारत कडक सुरूवात केली आहे.
भारताकडून जसप्रीत बुमराह याला विश्रांती देण्यात आली आहे. बुमराहच्या जागी प्रसिद्ध कृष्णा याला संधी दिली आहे.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ (C), मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस, अॅलेक्स कॅरी (W), कॅमेरॉन ग्रीन, सीन अॅबॉट, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड, स्पेन्सर जॉन्सन
भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W/C), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा
दुसऱ्या वन डे सामन्यामध्ये कांगारूंनी स्टीव्ह स्मिथकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. स्मिथ याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.