Ind vs Jpn : टीम इंडियासोबत तीन IPL स्टार्स जपानला रवाना, तिघेही खेळणार, पण… कोण आहे त्रिमूर्ती?
टीम इंडियासोबत जपानला तीन आयपीएल स्टार्स गेलेले दिसून आले आहेत. त्यांचीही आता काय भूमिका असणार याची चर्चा सुरु झाली आहे. नेमके कोण आहेत हे तिघे?

टीम इंडिया आता जपानला रवाना झाली आहे. भारताचा या मेगा स्पर्धेतील प्रवास 28 सप्टेंबर रोजी सुरु होणार आहे. दरम्यान, मागील एशियन गेम्समध्ये भारताने गोल्ड मेडल जिंकलं होतं. टीम इंडियाचा इरादा याहीवेळी पुन्हा एकदा गोल्ड मिळवायचाच आहे. त्यामुळे कोणतीही तडजोड न करता निवडकर्त्यांनी सर्वात बेस्ट टीम याठिकाणी पाठवली आहे. आज टीम इंडियासोबत आणखी तीन खास खेळाडूही जपानला गेलेले पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे आता हे खेळाडू नेमके कोण आणि त्यांना काय भूमिका दिली जाणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
एशियन गेम्स 2026 पूर्वी टीम इंडिया जपानसोबत एक टी20 सामना खेळणार आहे. त्यामुळे आजच जपानला रवाना झाली आहे. हा सामना22 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. दरम्यान, यावेळी टीम इंडियाबरोबर ठरवलेल्या खेळांडूव्यतिरिक्त आणखी तीन खेळाडूदेखील पाहायला मिळाले आहेत. यामध्ये आरसीबीचा वेगवाग गोलंदाज रसिख सलाम डार कोलकाताचा स्टार प्लेअर कार्तिक त्यागी आणि आरसीबीचा विक्की ओस्टवाल यांचा समावेश आहे.
दरम्यान, अशी माहिती समोर आली आहे की, टीम इंडियाला जपानमध्ये नेट बॉलर मिळणार नाहीत. त्यामुळे या तीन गोलंदाजांना जपानला पाठवण्यात आले आहे. या गोलंदाजांच्या सहाय्याने टीम इंडिया चांगल्याप्रकारे नेट प्रॅक्टिस करु शकणार आहे. दरम्यान, आयपीएल 2026च्या आयपीएल हंगामामध्ये रसिख समाल डार आणि कार्तिक त्यागी यां दोघांनी कमालीचा खेळ दाखवला होता. त्यांच्या या खेळामुळे ते त्यांची टीम इंडियासाठीही निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण ते काही होऊ शकलं नाही. पण तरीही त्यांना मैदानातच पण नेट प्रॅक्टिसमध्ये टीम इंडियासाठी त्यांचं योगदान देण्याची संधी मात्र मिळाली आहे. हे तीन खेळाडू थेट खेळू शकणार नसले तरी ते टीम इंडियाला मोठी मदत करणार आहेत.
दरम्यान, टीम इंडिया जपानला पोहोचल्यानंतर आजचा दिवस आराम करणार आहे. त्यानंतर उद्या 321 सप्टेंबर रोजी सानो मैदानावर प्रॅक्टिससाठी उतरणार आहेत. त्यानंतर याच मैदानावर भारत विरुद्ध जपान हा ऐतिहासिक सामना रंगणार आहे. हा सामना भारत आणि जपानमधील 75 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने खेळवला जाणार आहे. त्यानंतर टीम इंडिया एशियन गेम्समध्ये आइची नायोगा याठिकाणी जाणार आहे.