IND vs NZ 2nd T20: सूर्यकुमार, दीपक हुड्डा ठरले हिरो, टीम इंडियाचा न्यूझीलंडवर मोठा विजय

IND vs NZ 2nd T20: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडमध्ये युवा टीमची जबरदस्त सुरुवात

IND vs NZ 2nd T20: सूर्यकुमार, दीपक हुड्डा ठरले हिरो, टीम इंडियाचा न्यूझीलंडवर मोठा विजय
Team india
Image Credit source: bcci
| Updated on: Nov 20, 2022 | 4:10 PM

माऊंट माऊंगानुई: टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये आज माऊंट माऊंगानुई येथे दुसरा टी 20 सामना झाला. वेलिंग्टन येथे पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे आजच्या मॅचकडे कोट्यवधील क्रिकेट रसिकांचे डोळे लागले होते. टी 20 वर्ल्ड कपमधील पराभवाच्या कटू आठवणी मागे सोडून टीम इंडिया आज मैदानात उतरली होती. आजच्या मॅचमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडवर 65 धावांनी विजय मिळवला.

सूर्यकुमार यादव हिरो

सूर्यकुमार यादव आजच्या दिवसाचा हिरो ठरला. त्याच्या 51 चेंडूतील नाबाद 111 धावांच्या खेळीच्या बळावर टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 192 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग न्यूझीलंडचा डाव 126 धावांवर आटोपला.

विलयम्सन एकटा लढला

न्यूझीलंडकडून कॅप्टन केन विलयम्सन एकटा लढला त्याने 52 चेंडूत 61 धावा केल्या. यात 4 चौकार आणि 2 षटकार होते. त्याच्या व्यतिरिक्त न्यूझीलंडचा एकही फलंदाज चमकदार खेळ दाखवू शकला नाही.

गोलंदाजांनी चोख भूमिका बजावली

न्यूझीलंडला विजयासाठी मोठ लक्ष्य दिल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावली. त्यांनी सुरुवातीपासून न्यूझीलंडला मोकळेपणाने फलंदाजी करु दिली नाही. पहिल्याच ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारने न्यूझीलंडला धक्का दिला आहे. फिन एलनला शुन्यावर अर्शदीपकरवी झेलबाद केलं. न्यूझीलंडला शेवटपर्यंत या सामन्यात सूर सापडला नाही. भारताकडून दीपक हुड्डाने सर्वाधिक 4, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराजने प्रत्येकी 2 तर वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमारने 1-1 विकेट घेतला.