Shubhaman Gill : ‘तिला’ शुभमनसोबत डेटवर जायचं होत, पण भर मैदानात अर्शदीपने मोडलं मन, VIDEO

| Updated on: Feb 03, 2023 | 1:47 PM

Shubhaman Gill : शुभमन गिलच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. जस-जसा शुभमन गिलच्या धावांचा ग्राफ वरती जातोय, तसतशी त्याची फॅन फॉलोईंग वाढत चाललीय.

Shubhaman Gill : तिला शुभमनसोबत डेटवर जायचं होत, पण भर मैदानात अर्शदीपने मोडलं मन, VIDEO
Shubhaman-Gill
Image Credit source: BCCI
Follow us on

अहमदाबाद : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शुभमन गिल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. फॉर्मेट कुठलाही असो, वनडे, टेस्ट किंवा T20, शुभमन गिलच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. जस-जसा शुभमन गिलच्या धावांचा ग्राफ वरती जातोय, तसतशी त्याची फॅन फॉलोईंग वाढत चाललीय. गिलबद्दल तरुणीमध्ये वेगळी क्रेझ दिसून येतेय. अशीच एक महिला फॅन शुभमन गिलचा खेळ पाहण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहोचली. पण तिथे अर्शदीपने तिचं मन मोडलं.

गिलबद्दलच्या प्रेमाची कबुली दिली

शुभमन गिलने बुधवारी न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या T20 सामन्यात दमदार प्रदर्शन केलं. त्याने 63 चेंडूत 200 च्या स्ट्राइक रेटने नाबाद 126 धावा फटकावल्या. आपल्या इनिंगमध्ये शुभमनने 12 फोर आणि 7 सिक्स मारले. त्याला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. गिल एकाबाजूला धावांचा पाऊस पाडत होता, त्याचवेळी महिला फॅनने प्लेकार्डवरुन गिलबद्दलच्या आपल्या प्रेमाची कबुली दिली.


अर्शदीपमुळे तुटलं मन

स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या महिला फॅनच्या हातात प्लेकार्ड होता. ‘टिंडर, शुभमनशी जोडी जुळवून दे’ असा मेसेज त्यावर लिहिलेला होता. टिंडर डेटिंग APP वरुन लोक परस्परांना भेटतात. जोड्या जुळतात. मॅचनंतर शुभमन जेव्हा, प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेला, तेव्हा या महिला फॅनसह अन्य शुभमनला चीयर करत होते. टीमचे काही खेळाडू बाऊंड्री लाइनवर होते. त्यांनी मुलीच्या हातातील प्लेकार्ड वाचलं. अर्शदीपने त्यावेळी इशारा करुन हे जुळणार नाही, असं सांगितलं. अर्शदीपमुळे त्या महिला फॅनच मन मोडलं.

शुभमन सारा अली खानला डेट करतोय का?

शुभमन आणि सारा खान या दोघांचा फोटो एका यूझरने शेअर केला आहे. हा फोटो एअरपोर्टवरचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. फोटोत सारा आणि शुबमन सोबत बसलेले आहेत. दोघं एकमेकांसोबत बोलतायेत. या दोघांचा फोटो व्हायरल झाल्याने नक्कीच काही तरी सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सारा आणि शुबमनचा फोटो आत्ताचा आहे की जुना, याबाबतही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या दोघांमध्ये नक्कीच काही तरी गॅटमॅट सुरु असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणनं आहे.