IND vs NZ: माजी खेळाडू रोहितच्या कामगिरीवर नाराज, विजयानंतरही नेतृत्वाबाबत उपस्थित केले सवाल

| Updated on: Nov 18, 2021 | 5:03 PM

वेंकटेश अय्यरला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली आणि तो शेवटच्या षटकात फलंदाजीसाठी आला. तो चार धावांवर बाद झाला. अय्यर हा हार्दिक पंड्याच्या भूमिकेत दिसत आहे.

IND vs NZ: माजी खेळाडू रोहितच्या कामगिरीवर नाराज, विजयानंतरही नेतृत्वाबाबत उपस्थित केले सवाल
Team India
Follow us on

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 मालिका खेळवली जात आहे. बुधवारी या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारताने चांगली सुरुवात केली. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताने बुधवारी न्यूझीलंडचा पाच गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने भारतासमोर 165 धावांचे आव्हान उभे केले होते. भारताने हे लक्ष्य दोन चेंडू आणि पाच गडी राखून पूर्ण केले. यासह रोहित शर्माने आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीची शानदार सुरुवात केली आहे. भारताच्या T20 संघाचा नवा कर्णधार म्हणून रोहितची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, एकीकडे कर्णधार रोहितचं कौतुक होत असताना दुसऱ्या बाजूला एका माजी खेळाडूने रोहितच्या नेतृत्वाबाबत सवाल उपस्थित केले आहेत. (India vs New Zealand : Aakash Chopra says Rohit Sharma Made An Error Of Not Bowling Venkatesh Iyer)

या सामन्यात भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने रोहितच्या नेतृत्वाबाबत सवाल उपस्थित केला आहे. त्याने संघाच्या विचार आणि रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या सामन्यात टीम इंडियाने वेंकटेश अय्यरचा ज्या प्रकारे वापर केला होता, ते आकाशला आवडले नाही. अय्यर पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत होता.

अय्यरला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली आणि तो शेवटच्या षटकात फलंदाजीसाठी आला. तो चार धावांवर बाद झाला. अय्यर हा हार्दिक पंड्याच्या भूमिकेत दिसत आहे. तो गोलंदाजीतही सक्षम आहे. इथे आकाशला एकच गोष्ट खटकली. त्याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, अय्यरला वेगवान गोलंदाज आणि खालच्या क्रमांकावरील आक्रमक फलंदाज म्हणून संघात घेतले आहे, पण त्याला गोलंदाजी करण्याची संधी देण्यात आली नाही. तो म्हणाला, “भारतीय संघाने सांगितले होते, की त्यांना वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडूची गरज आहे, म्हणून त्यांनी अय्यरला सहाव्या क्रमांकावर खेळवले. पण अय्यरला गोलंदाजी करायला मिळाली नाही. मी म्हणेन की, ही रोहितच्या मोजक्या चुकांपैकी एक आहे. त्याचे नेतृत्व सर्वसाधारणपणे उत्कृष्ट असते. पण त्याच्या या निर्णयाने मी हैराण झालो.”

अय्यरचा वापर कधी करता आला असता?

रोहित शर्मा अय्यरचा गोलंदाज म्हणून कसा वापर करू शकला असता, हेही आकाशने सांगितले. आकाश म्हणाला, “रोहित अय्यरकडून गोलंदाजी करून घेऊ शकला असता. जेव्हा तुम्ही नाणेफेक जिंकलेली असते आणि तुम्हाला गोलंदाजी करायची असते आणि समोरचा संघ संघर्ष करत असतो तेव्हा तुम्ही अय्यरसारख्या गोलंदाजाला संधी द्यायला हवी. विशेषतः डावाच्या पहिल्या हाफमध्ये दीपक चाहर आणि मोहम्मद सिराज यांचा दिवस चांगला नव्हता, अशावेळी तुम्ही चेंडू अय्यरसारख्या गोलंदाजाच्या हाती सोपवायला हवा होता.

आयपीएल 2021 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळताना अय्यरने चमकदार कामगिरी केली. त्याने 10 सामन्यात 370 धावा केल्या. याशिवाय तीन विकेट घेण्यातही तो यशस्वी ठरला. आयपीएलमध्ये तो सलामीवीर म्हणून खेळला असला तरी त्याला न्यूझीलंडविरुद्ध 6 व्या क्रमांकावर पाठवण्यात आले.

इतर बातम्या

T20 World Cup 2021 मध्ये भारतीय संघात स्थान न मिळालेल्या चहलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

ICC कडून सौरव गांगुलीच्या खांद्यावर मोठी जबाबदारी, क्रिकेटशी संबंधित नियम-कायदे बनवणार

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार? क्रीडा मंत्र्यांची सावध प्रतिक्रिया

(India vs New Zealand : Aakash Chopra says Rohit Sharma Made An Error Of Not Bowling Venkatesh Iyer)