
कोलंबो : श्रीलंकेविरुद्ध दमदार विजय मिळवून टीम इंडिया आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. चायनामन गोलंदाज कुलदीप यादव टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. श्रीलंकेविरुद्ध त्याने 43 धावात 4 विकेट घेतले. कुलदीप यादवने सलग दुसऱ्या सामन्यात टीमला विजय मिळवून दिला. पाकिस्तान विरुद्ध कुलदीपने पाच विकेट काढले होते. आशिया कपच्या दोन सामन्यात कुलदीप यादवने 9 विकेट घेतल्या आहेत. कुलदीप यादवने श्रीलंकेविरुद्ध उत्तम गोलंदाजीच श्रेय सूर्यकुमार यादवला दिलं. मॅचनंतर सूर्यकुमार यादवने कुलदीप यादव बरोबर चर्चा केली. कुलदीप यादवला चांगल्या प्रदर्शनाबद्दल विचारलं. आपल्या चांगल्या परफॉर्मन्समागे सूर्यकुमार यादवचा रोल असल्याच कुलदीपने सांगितलं.
सूर्यकुमार मॅचच्या दोन मिनिट आधी आपल्याशी बोलला होता, असं कुलदीप म्हणाला. पाकिस्तान सारखीच गोलंदाजी श्रीलंकेविरुद्ध करायची आहे, असं सूर्यकुमार कुलदीपला म्हणाला होता. पाच विकेट घेतल्यानंतर तुम्ही पुढच्या मॅचमध्ये थोडे रिलॅक्स होता. पण सूर्यकुमारने कुलदीपला आणखी चांगला खेळ दाखवायला सांगितलं. कुलदीप यादवने सूर्यकुमारला आपल्या यशाच श्रेय दिलं. त्यावेळी तो थोडा भावुक झाला होता. सलग दोन सामने खेळण्यासाठी शरीराची कशी तयारी केली? त्या बद्दलही कुलदीपने सांगितलं.
श्रीलंकेविरुद्ध सामन्याच्या दिवशी कुलदीपने काय केलं?
“पाकिस्तान विरुद्ध सामन्यानंतर रिकव्हरीसाठी कुलदीप स्विमिंग पूलमध्ये गेला. त्यानंतर चांगला डिनर केला. श्रीलंकेविरुद्ध सामना होता. त्या दिवशी तो सकाळी 10 वाजल्यानंतर उठला. चांगला नाश्ता केला. देशासाठी कुठलाही सामना खेळताना चांगलं प्रदर्शन करण्याची जिद्द मनामध्ये असते” असं कुलदीपने सांगितलं.
From secrets behind bowling brilliance to that superb catch & more 👌 👌
In conversation with @imkuldeep18 & @surya_14kumar after #TeamIndia‘s win over Sri Lanka in Super 4s 👍 👍 – By @RajalArora
FULL INTERVIEW 🎥 🔽 #AsiaCup2023 | #INDvSL https://t.co/xlAIq9qIqj pic.twitter.com/sVl7y7L50b
— BCCI (@BCCI) September 13, 2023
केएल राहुलकडे का इशारा केला?
समाविक्रमाचा विकेट घेतल्यानंतर केएल राहुलकडे का इशारा करत होता?असा प्रश्न सूर्यकुमार यादवने कुलदीपला विचारला. त्यावर कुलदीपने सांगितंल की, “चेंडू खूप वळतोय असं केएल राहुलने सांगितलं होतं. त्याने पाचव्या स्टम्पवर गोलंदाजीचा सल्ला दिला होता. जेणेकरुन फलंदाजाला खेळताना अडचण येईल. तो सल्ला कामी आला व समाविक्रमाच्या विकेटच श्रेय केएल राहुलला दिलं”