IND vs SL : कुलदीप मॅचविनर पण त्याची एक सवय टीम इंडियासाठी ठरेल घातक, रोहितनेही टेकले हात!
Kuldeep Yadav : भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव याने चमकदारा कामगिरी केली आहे. टीमसाठी हुकमी एक्का ठरत असला तरी त्याची एक सवय संघासाठी घातक ठरू शकते. रोहितनेही त्याच्यापुढे हात टेकल्याचं दिसून आलं.

मुंबई : आशिया कप 2023 मधील सुपर-4 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये झालेल्या थरारक सामन्यामध्ये रोहित शर्मा अँड कंपनीने विजय मिळवला. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताचा डाव 213 धावांवर आटोपला. भारताच्या मुख् फलंदाजांना श्रीलंकेच्या दुनिथ वेललागेने आऊट करत सुरूंग लावला होता. मात्र त्यानंतर गोलंदाजांनी भारताला सामन्यात कमबॅक करून दिलं. कुलदीप यादव भारतासाठी गमेचेंजर ठरताना दिसत असून गड्याने 4 विकेट्स घेत महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र त्याने आपल्या एका गोष्टीवर कंट्रोल ठेवायला हवा.
नेमकी कोणती गोष्ट?
कुलदीप यादव याने त्याच्या करिअरमध्ये अनेक चढउतार पाहिले आहेत. माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी असताना कुलचा जोडीने संघातील स्थान पक्क केलं होतं. मात्र धोनी निवृत्त झाल्यावर ना चहल ना कुलदीप कोणालाही संघात एकसारखी जागा मिळवता आली नाही. दोघेही आत-बाहेर होताना दिसले, आता कुलदीपने संघात जागा मिळवली असून वर्ल्ड कपसाठी त्याच्याकडे गेमचेंजर स्पिनर म्हणून पाहिलं जात आहे. मात्र त्याने आपली एक गोष्ट बदलायला हवी.
कोणत्याही गोलंदाजाला अपील झाल्यावर रिव्ह्यू घ्यावासाच वाटतो. प्रत्येकवेळी असे रिव्ह्यू घेतले आणि ते फेल गेले तर त्याचा फटका संघालाच बसतो. कुलदीपची बॉलिंग फलंदाजांना खेळणं कठीण होऊन जाते. त्यामुळे अनेकवेळा अपीलही होते, त्यावेळी कुलदीप रिव्ह्यू घेण्यासाठी कर्णधाराच्या मागेच लागतो. कीपरचा सल्ला घेऊन चर्चा करून रिव्ह्यूची कप्तानकडे मागणी करावी. परंतु एकदा अपील केलं की त्याला रिव्ह्यू घ्यायचाच असतो. वर्ल्ड कपमध्ये त्याची ही गोष्ट संघासाठी तोट्याची ठरू शकते. त्यामुळे कुलदीपने लवकरात लवकर यावर विचार करायल हवा.
श्रीलंकेच्या सामन्यातही हट्टच धरला
दरम्यान, श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात बॅटला बॉल न लागता के. एल. राहुलच्या हाताला लागून स्लिपला कॅच गेला होता. तेव्हा कुलदीपने रोहितला रिव्ह्यू घेण्यासाठी भाग पाडलं, राहुल त्याला समजावत होता की माझ्या हाताला चेंडू लागला आहे. कुलदीपच्या हट्टानंतर रोहितने रिव्ह्यू घेतला आणि तो फेल गेला. त्यानंतर राहुलने रोहतजवळ जात त्याला आपण रिव्ह्यू नको सांगत असल्याचं ऐकवलं. आशिया कप ठिक आहे पण जर वर्ल्ड कपमध्ये असा आततायी पण केला तर ती चूक संघासाठी घातक ठरू शकते.
