AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : कोण बोलतं रे वडापाव, रोहितचा कॅच पाहून ट्रोलर्सची बोलती बंद, पाहा व्हिडीओ

Rohit Sharm Super Catch : आशिया कपमधील श्रीलंका आणि भारतामध्ये झालेल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा याने कडक कॅच घेतला आहे. रोहितला अनफिट म्हणणाऱ्यांना हा कॅच म्हणजे चपराक दिल्यासारखी आहे.

IND vs SL : कोण बोलतं रे वडापाव, रोहितचा कॅच पाहून ट्रोलर्सची बोलती बंद, पाहा व्हिडीओ
| Updated on: Sep 13, 2023 | 11:19 AM
Share

मुंबई : भारत आणि श्रीलंकेमध्ये झालेल्या रोमहर्षक सामन्यामध्ये भारताने 41 धावांनी विजय मिळवला. या सामन्यामध्ये भारतीय खेळाडूंनी कडक फिल्डिंग करत श्रीलंकेच्या हातातोंडाशी आलेला विजय हिसकावला. या सामन्यामध्ये सर्व खेळाडूंनीच कमाल फिल्डिंग केल्याचं दिसलं. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला अनेकदा अनफिट म्हणत हिणवलं जातं. ‘मुंबईचा वडापाव’ म्हणून त्याला काही ट्रोलर्स सुनावतात. मात्र पठ्ठ्याने एकदम कडक कॅच घेत सर्वांची मनं जिंकली आहेत.

रविंद्र जडेजाच्या 26 व्या ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूवर कॅच आऊट झाला. स्लीपला उभ्या असलेल्या रोहित शर्माने चपळाई कडक कॅच घेतला. पापणी लवण्याच्या आत चेंडू बॅटची कडा घेऊन स्लीपकडे गेला. तिथे असलेल्या रोहितने कोणतीही चूक केली नाही आणि एक अफलातून कॅच पकडला.

पाहा व्हिडीओ :-

रोहितने या सामन्यात आपल्या नेतृत्त्वामधील सर्व गुणकौशल्य दाखवून दिले,  कोणत्या फलंदाजांवेळी स्पिनर आणि कोणत्या फलंदाजांवेळी वेगवान गोलंदाज लावायचे हे त्याने बरोबर बदल केले. या बदलांमुळे आणि योग्य ठिकाणी केलेली फिल्ड प्लेसमेंटच्या मतदीने हा सामना भारताने जिंकला.

दरम्यान, रोहित अँड कंपनीने सांघिक कामगिरीच्या जोरावर संपूर्ण सामना पालटवला. श्रीलंकेचा युवा खेळाडू दुनिथ वेललागे याने शेवटपर्यंत नाबाद राहत भारताला बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (C), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (W), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शानाका (C), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (W), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा आणि मथीशा पाथिराना.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.