AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नैऋत्य दिशेला दरवाजा म्हणून शिंदे गटाने कार्यालयच नाकारलं, BMC मधील ते ऑफिस म्हणजे संकट?

मुंबई महापालिकेत पक्षांना कार्यालयांचे वाटप करण्यात आले आहे. परंतु एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांना देऊ केलेले कार्यालय नाकारले आहे.

नैऋत्य दिशेला दरवाजा म्हणून शिंदे गटाने कार्यालयच नाकारलं, BMC मधील ते ऑफिस म्हणजे संकट?
eknath shindeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 07, 2026 | 6:16 PM
Share

BMC Eknath Shinde Office : मुंबई महापालिकेची निवडणूक महायुतीने जिंकलेली आहे. या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. येत्या 11 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या महापौरपदाची निवड केली जाणार आहे. या पदासाठी भाजपाने रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केली आहे. महायुतीत उपमहापौर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला आले आहे. शिंदे गटाकडून संजय वर्णी यांचे नाव उपमहापौरपदासाठी निवडण्यात आले आहे. महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडीनंतर आता मुंबईच्या विकासासाठी अनेक महायुती जोमात कामाला लागणार आहे. त्याआधी महापालिकेत प्रत्येक पक्षाला कार्यालयांचे वाटप केले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मात्र देऊ केलेले कार्यालय नाकारले आहे. ऑफिसचे स्थान आणि त्या ऑफिसच्या दरवाजाची दिशा यामुळे शिंदे गटाने हे कार्यालय नाकारले आहे.

ऑफिस मिळाले, पण लगेच नाकारले

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महापालिका कार्यालयात शिंदे यांच्या शिवसेनेला नैऋत्य दिशेला द्वार असलेले कार्यालय देण्यात आले होते. परंतु या कार्यालयाबाबत शिंदे गटात वेगवेगळ्या चर्चा चालू झाल्या होत्या. वास्तूशास्त्रानुसार नैऋत्य दिशेला असलेले द्वार हे दुर्भाग्याचे लक्षण आहे, असे शिंदे गटात म्हटले जात होते. हे ऑफिस यापूर्वी काँग्रेसचे होते. सध्या काँग्रेसची मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे, असे मत शिवसेनेच्या नेत्यांचे आहे. त्यामळेच शिंदे गटाने देऊ केलेले हे कार्यालय नाकारण्यात आले असून ते पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला दिलेले आहे.

कोणत्या पक्षाला कोणते कार्यालय देण्यात आले?

आता ठाकरे आणि शिंदे यांची शिवसेना यांना विभागून एक कार्यालय देण्यात आले आहे. शिवसेनेचे जुने कार्यालय विभागून 30 टक्के भाग कार्यालय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तर 70 टक्के कार्यायल हेठाकरे यांच्या शिवसेनेला देण्यात आले आहे. 2017 साली देण्यात आलेले कार्यालय पुन्हा एकदा भाजपालाच देण्यात आले आहे. कार्यालय क्र. 4 हे मनसेला तर कार्यालय क्र. 05 हे AIMIM पक्षाला देण्यात आले आहे. कार्यालय क्र. 07 काँग्रेसला तर कार्यालय क्र. 08 राष्ट्रवादी (अजित पवार) राष्ट्रवादी (शरद पवार), समाजवादी पार्टी एकत्रित या तिन्ही पक्षांना देण्यात आले आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?