श्रीलंका संघाकडून आव्हानात्मक लक्ष्य, भारतीय फलंदाजावर विजयाची जबाबदारी

| Updated on: Jul 18, 2021 | 7:41 PM

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यातील पहिला डाव संपला आहे. संयमी फलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने भारतासमोर 263 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

श्रीलंका संघाकडून आव्हानात्मक लक्ष्य, भारतीय फलंदाजावर विजयाची जबाबदारी
भारत आणि श्रीलंका सामन्यातील एक क्षण
Follow us on

कोलंबो : भारत (Indian Cricket Team) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंका संघाने दिलासादायक फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 263 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकल श्रीलंका संघाने फलंदाजी घेतली. सुरुवातीचे फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील कर्णधार शनाकाने 39 धावा लगावल्या. तर 9 व्या विकेटसाठी चमिका करुणारत्ने (नाबाद 43) आणि दुश्मंता चमीरा (13) यांनी 40 धावांची भागीदारी करत संघाला एक आव्हानात्मक लक्ष्य मिळवून दिलं.

भारतीय गोलंदाजीचा विचार करता तब्बल दोन वर्षानंतर एकत्र आलेल्या ‘कुल्चा’ अर्थात कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल जोडीने महत्त्वाचे दोन-दोन विकेट घेतले. सामन्यात उपकर्णधार भुवनेश्वरनेमात्र निराशाजनक कामगिरी केली. त्याला एकही विकेट मिळवता आला नाही. उलट त्याच्या 9 ओव्हरमध्ये त्याला तब्बल 63 रन पडले. त्याला शेवटच्या ओव्हरमध्ये तर दोन षटकारांसह एक चौकरही खावा लागला. भारताकडून दोन्ही पांड्या बंधूनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवला. या सामन्यात भारताकडून सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांना वन-डे डेब्यू केला. तर  श्रीलंका संघातून भानुका राजपक्षाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

शिखर धवनचे अनोखे विक्रम

या दौऱ्यात भारताचे कर्णधारपद भूषवणारा शिखर भारतीय इतिहासातील संघाचा 25 वा कर्णधार आहे. सर्वाधिक वयात कर्णधार होण्याचा विक्रम शिखरने केला आहे. दिग्गज क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ आणि हेमू अधिकारी यांना मागे टाकत शिखरने हा विक्रम केला आहे. धवन कर्णधारपद स्वीकारताना 35 वर्ष 225 दिवसांचा आहे. याआधी हेमू अधिकारी हे 35 वर्ष आणि मोहिंदर अमरनाथ 34 वर्ष 37 दिवसांचे असताना कर्णधारपद स्वीकारलं होतं. शिखर धवनने 11 वर्षांपूर्वी भारताकडून एकदिवसीय संघात पदार्पण केले होते.  2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवणाऱ्या धवनचे तेव्हा वय 24 वर्षे होते. 11 वर्षानंतर कर्णधार होत इतक्या प्रतिक्षेनंतर कर्णधार होणाराही तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. भारतासाठी सर्वाधिक वन-डे खेळून कर्णधार होण्यात शिखरचा तिसरा नंबर लागतो. त्याने 142 वनडे खेळल्यानंतर कर्णधारपद स्वीकारलं. त्याच्याआधी नंबर अनिल कुंबळेचा लागतो अनिलने 217 वनडे खेळल्यानंतर कर्णधारपद स्वीकारलं. तर रोहित शर्माने 171 वनडे खेळल्यानंतर कर्णधारी स्वीकारली.

संबंधित बातम्या 

IND vs SL : शिखर धवनने मैदानात पाऊल ठेवताच केला मोठा विक्रम, धोनी-कोहलीलाही टाकलं मागे

India vs Sri Lanka Live Score, 1st ODI : कुलदीप यादवची जादू, एकाच ओव्हरमध्ये दोन महत्त्वाचे विकेट्स

IND vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात संजूला संधी नाही, ‘या’ कारणामुळे एकदिवसीय संघातील स्थान हुकलं

(India vs Sri Lanka First Innings Over Sri lanka Sets 263 Runs Target in front of Indian Batsmans)