
मुंबई : भारत आणि श्रीलंकेमध्ये झालेल्या रोमहर्षक सामन्यामध्ये भारताने 41 धावांनी विजय मिळवला. या सामन्यामध्ये भारतीय खेळाडूंनी कडक फिल्डिंग करत श्रीलंकेच्या हातातोंडाशी आलेला विजय हिसकावला. या सामन्यामध्ये सर्व खेळाडूंनीच कमाल फिल्डिंग केल्याचं दिसलं. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला अनेकदा अनफिट म्हणत हिणवलं जातं. ‘मुंबईचा वडापाव’ म्हणून त्याला काही ट्रोलर्स सुनावतात. मात्र पठ्ठ्याने एकदम कडक कॅच घेत सर्वांची मनं जिंकली आहेत.
रविंद्र जडेजाच्या 26 व्या ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूवर कॅच आऊट झाला. स्लीपला उभ्या असलेल्या रोहित शर्माने चपळाई कडक कॅच घेतला. पापणी लवण्याच्या आत चेंडू बॅटची कडा घेऊन स्लीपकडे गेला. तिथे असलेल्या रोहितने कोणतीही चूक केली नाही आणि एक अफलातून कॅच पकडला.
Cannot keep @imjadeja out of the game! 🤯
Rewarded for his disciplined bowling, Jaddu sends skipper @dasunshanaka1 packing!#SriLanka in trouble.
Tune-in to #AsiaCupOnStar, LIVE NOW on Star Sports Network#INDvSL #Cricket pic.twitter.com/vsI2M1TTDr
— Star Sports (@StarSportsIndia) September 12, 2023
रोहितने या सामन्यात आपल्या नेतृत्त्वामधील सर्व गुणकौशल्य दाखवून दिले, कोणत्या फलंदाजांवेळी स्पिनर आणि कोणत्या फलंदाजांवेळी वेगवान गोलंदाज लावायचे हे त्याने बरोबर बदल केले. या बदलांमुळे आणि योग्य ठिकाणी केलेली फिल्ड प्लेसमेंटच्या मतदीने हा सामना भारताने जिंकला.
दरम्यान, रोहित अँड कंपनीने सांघिक कामगिरीच्या जोरावर संपूर्ण सामना पालटवला. श्रीलंकेचा युवा खेळाडू दुनिथ वेललागे याने शेवटपर्यंत नाबाद राहत भारताला बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (C), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (W), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शानाका (C), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (W), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा आणि मथीशा पाथिराना.