AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वनडेनंतर आता भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-२०चा थरार रंगणार! 6 ऑक्टोबरला पहिला सामना, टीम इंडियात 9 मोठे बदल होणार

India vs West Indies T20 Series: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ५ सामन्यांची टी२० मालिका ६ ते १७ ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाणार आहे. सर्व सामने संध्याकाळी ७ वाजता सुरू होतील. प्लेइंग ११ बाबतही माहिती समोर आली आहे.

वनडेनंतर आता भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-२०चा थरार रंगणार! 6 ऑक्टोबरला पहिला सामना, टीम इंडियात 9 मोठे बदल होणार
| Updated on: Oct 04, 2026 | 4:13 PM
Share

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका संपली आहे. यानंतर आता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० क्रिकेटची वेळ आली आहे. दोन्ही संघ पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहेत. याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या मालिकेतील पहिला सामना ६ ऑक्टोबर रोजी, तर अंतिम सामना १७ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. हे पाचही सामने वेगवेगळ्या शहरांमध्ये होणार आहेत. तर या मालिकेसाठी टीम इंडियातील काही खेळाडू बाहेर असणार आहेत. त्यांच्या जागी दुसऱ्या खेळाडूंना संधी मिळणार आहे. याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला टी२० सामना ६ ऑक्टोबर रोजी लखनौमध्ये खेळला जाईल. भारत आणि वेस्ट इंडिज हे संघ भारतरत्नश्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर एकमेकांसमोर उभे येणार आहेत. हा सामना सायंकाळी ७:०० वाजता सुरू होणार आहे. दोन्ही संघांमधील दुसरा टी२० सामना ९ ऑक्टोबर रोजी रांची येथील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये खेळला जाईल. सामना सायंकाळी ७:०० वाजता सुरू होईल.

या मालिकेतील तिसरा सामना ११ ऑक्टोबर रोजी इंदूरमध्ये खेळला जाईल. हा सामना होळकर स्टेडियमवर आयोजित केला जाईल. हा सामना देखील सायंकाळी ७:०० वाजता सुरू होईल. दोन्ही संघ १४ ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये दाखल होतील आणि राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सायंकाळी ७:०० वाजता चौथा टी२० सामना खेळवला जाईल. मालिकेतील पाचवा आणि अंतिम टी२० सामना १७ ऑक्टोबर रोजी बंगळूरुमध्ये खेळला जाईल. हा सामनाही एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सायंकाळी ७:०० वाजता सुरू होईल. तर आता या मालिकेतील प्लेइंग ११ बाबत मोठी माहिती समोर आली आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या तुलनेत टी२० सामन्यासाठीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये भारतीय संघातील नऊ खेळाडू बाहेर असतील. यामध्ये कर्णधार शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, गुरनूर ब्रार आणि अंशुल कंबोज यांचा समावेश आहे. टी-२० मालिकेत भारताचा कर्णधार श्रेयस अय्यर असणार आहे. त्याने जपानमध्ये २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. याव्यतिरिक्त संघात वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, ईशान किशन, संजू सॅमसन, रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंग यांसारखे खेळाडू असतील. एकदिवसीय संघाचा भाग असलेले कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी आणि नमन धीर हे देखील टी-२० मालिकेत खेळताना दिसणार आहेत.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यासाठी भारताचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन – अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर (कर्णधार), इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि प्रिन्स यादव/मयंक यादव

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात