Yashasvi Jaiswal | यशस्वी जयस्वाल याचं विंडिज विरुद्ध टी 20 डेब्यू, धमाकेदार कामगिरीची अपेक्षा

Yashasvi Jaiswal West Indies vs India 3rd T20I | यशस्वी जयस्वाल याच्यासाठी हार्दिक पंड्या याने विकेटकीपर बॅट्समनला टीममधून बाहेर केलंय.

Yashasvi Jaiswal | यशस्वी जयस्वाल याचं विंडिज विरुद्ध टी 20 डेब्यू, धमाकेदार कामगिरीची अपेक्षा
| Updated on: Aug 08, 2023 | 8:49 PM

गयाना | वेस्ट इंडिज विरुद्धच्या 5 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 2-0 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी आणि मालिकेच्या दृष्टीने तिसरा सामना हा निर्णायक असा आहे. विंडिजला तिसरा सामना जिंकून टीम इंडिया विरुद्ध 2016 नंतर टी 20 मालिका जिंकण्याची संधी आहे. तर टीम इंडियाने सलग 2 सामन्यातील पराभवानंतर तिसऱ्या सामन्यातील प्लेईंग इलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. यामध्ये एका खेळाडूचं टीममध्ये कमबॅक झालं आहे. तर एका युवा खेळाडूने टी 20 आय करियरची सुरुवात केली आहे.

यशस्वी जयस्वाल याने विंडिज विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यातून पदार्पण केलंय. हार्दिक पंड्या याने टॉस दरम्यान याबाबतची माहिती दिली. यशस्वीला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देण्यासाठी कॅप्टन हार्दिक पंड्या याने रोहित शर्मा याच्या लाडक्या खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. हार्दिकने ईशान किशन याला बाहेर बसवलंय. तर त्याच्या जागी यशस्वीला संधी दिलीय.

यशस्वी जयस्वाल याचं टी 20 पदार्पण

यशस्वीने महिन्याभरात विंडिज विरुद्धच दुसऱ्यांदा डेब्यू केला आहे. यशस्वीने विंडिज विरुद्ध 12 जुलै रोजी दुसऱ्या सामन्यातून कसोटी पदार्पण केलं होतं.

कुलदीप यादव याची एन्ट्री

दरम्यान दुसऱ्या सामन्याआधी नेट्समध्ये दुखापत झाल्याने कुलदीप यादव याला दुसऱ्या सामन्याला मुकावं लागलं होतं. मात्र कुलदीपने तिसऱ्या सामन्यातू कमबॅक केलं आहे. कुलदीपला रवी बिश्नोई याच्या जागी घेतलंय. रवीला दुसऱ्या सामन्यात विशेष असं करता आलं नाही. रवीने 4 ओव्हरमध्ये 31 धावा दिल्या होत्या.

वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | रोव्हमन पॉवेल (कॅप्टन), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड, रोस्टन चेस, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ आणि ओबेद मॅककॉय.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल आणि मुकेश कुमार.