IPL 2021 आणि टी-20 विश्वचषकात हार्दिक पंड्या गोलंदाजी करणार? भारतीय प्रशिक्षकाने दिली मोठी माहिती

| Updated on: Aug 22, 2021 | 10:55 AM

मागील दोन वर्षांपासून पाठीच्या दुखापतीमुळे हार्दीक पंड्या गोलंदाजीत खास कमाल करत नसून त्याला नियमित गोलंदाजीही देण्यात येत नाही. ज्यामुळे भारतीय संघात एका दमदार अष्टपैलू खेळाडूची कमी जाणवत आहे.

IPL 2021 आणि टी-20 विश्वचषकात हार्दिक पंड्या गोलंदाजी करणार? भारतीय प्रशिक्षकाने दिली मोठी माहिती
हार्दीक पंड्या
Follow us on

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) सध्या इंग्लंडविरुद्ध (England) कसोटी मालिका खेळत  असून त्यांचे लक्ष दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या टी-20 विश्वचषकावर आहे (ICC T20 World Cup 2021). या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी भारत देखील आपला दमदार संघ तयार करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान अष्टपैलू खेळाडू हार्दीक पंड्यावर (Hardik Pandya) यावेळी सर्वांची नजर असणार असून तो गोलंदाजी करणार का? याकडेही सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान भारताच्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीचे (NCA) प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे (Paras Mhambrey) यांनी हार्दीक पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या आयपीएलसह (IPL 2021)  टी-20 विश्वचषकातही गोलंदाजी करेल असा विश्वास वर्तवला आहे.

श्रीलंका दौऱ्यावरुन परतल्यानंतर हार्दीक नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये इतर खेळाडूंसोबत सराव आणि फिटनेस टेस्टमध्ये व्यस्त आहे. यावेळी त्यांच्यावर लक्ष ठेवून असलेले गोलंदाजीचे प्रशिक्षक म्हाम्ब्रे यांनी हार्दीक लवकरच नियमित गोलंदाजी करायला सुरु करेल असा विश्वास त्यांनी दर्शवला आहे. IANS या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हाम्ब्रे म्हणाले, “हार्दीकच्या सरावावर आणि गोलंदाजीवर आम्ही काम करत आहोत. पण त्याच्यावर आम्ही कोणताच दबाव टाकत नसलो तरी त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत. आगामी विश्वचषकासाठी आम्ही त्याला गोलंदाजीसाठी पुन्हा तयार करत आहोत.”

श्रीलंका दौऱ्यात केली होती गोलंदाजी

हार्दीक पंड्या मागील बराच काळ गोलंदाजीपासून दूर असला तरी नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यात मात्र त्याने काही ओव्हर गोलंदाजी केली. वनडे आणि टी-20 अशा दोन्ही सामन्यात त्याने गोलंदाजी केली होती. पण पाठीच्या दुखापतीमुळे त्याला हवी तशी गोलंदाजी करता आली नाही. याआधी मागील वर्षी अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यासह आय़पीएलमध्येही काही ओव्हर गोलंदाजी केली होती. पण फिटनेसच्या त्रासामुळे त्याची गोलंदाजी हवी तशी होत नव्हती. दरम्यान कर्णधार विराट कोहलीनेही हार्दीकच्या गोलंदाजीची गरज अनेकदा दर्शवली असून आता टी-20 विश्वचषकात तरी पंड्या गोलंदाजी करतो का? हे पाहावे लागेल.

इतर बातम्या

भारतीय खेळाडूंचे हे ‘एडिटेड’ फोटो तुम्ही पाहिले का?, विराटचा फोटो तर पाहाच

तब्बल 65 दिवसांनी पत्नीला भेटल्यानंतर सूर्यकुमार खुश, VIDEO शेअर करत व्यक्त केला आनंद

VIDEO : कॅप्टन कूल धोनी बनला रॉकस्टार, उर्वरीत IPL ची दणकेबाज घोषणा, म्हणतो ‘पिक्चर अभी बाकी है’

(Indian All rounder Hardik pandya will bowle in ipl 2021 and t20 world cup says paras mhambrey)