
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी दिवसेंदिवस क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सकूता पाहायला मिळत आहे. मात्र त्याआधी चाहत्यांना भारतीय संघाची घोषणा केव्हा होणार? याची उत्सूकता आहे. आता या स्पर्धेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबईत बीसीसीआयच्या मुख्यालयात बैठक होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे चाहत्यांचं लक्ष लागून आहे. या बैठकीनंतर या बहुप्रतिक्षित आणि महत्त्वाच्या स्पर्धेसाठी भारतीय संघाची 16 किंवा 17 ऑगस्टला घोषणा होऊ शकते. बैठकीत खेळाडूंची फिटनेस आणि पुनरागमनाबाबत चर्चा होऊ शकते. या बैठकीत बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर, निवड समिती सदस्य, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा आणि विराट कोहली टी 20i क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. तर आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे टी 20 फॉर्मेटने करण्यात आलं आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी तगडा संघ उतरवण्याचा निवड समितीचा मानस आहे. टीम इंडिया गतविजेता आहे. त्यामुळे भारतासमोर ट्रॉफी राखण्याचं आव्हान असणार आहे.
आशिया कप स्पर्धेतून भारताचा स्फोटक फलंदाज श्रेयस अय्यर याचं कमबॅक होणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. श्रेयसने पाठीच्या दुखापतीनंतर शानदार कामगिरी केली. श्रेयसने देशांतर्गत आणि आयपीएल 2025 स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली.
टीम इंडियाचा मॅचविनर ऑलराउंडर हार्दिक पंड्या फिटनेस टेस्टमध्ये पास झाला आहे. पंड्याने आतापर्यंत भारताला बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावर अनेकदा एकहाती सामने जिंकून दिले आहेत. हार्दिकने बंगळुरुत फिटनेसनवर मेहनत घेतली. त्यानंतर आगामी स्पर्धेसाठी हार्दिक फिट असल्याचं एनसीएने जाहीर केलं.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून संजू समॅसन चर्चेत आहे. संजू आयपीएल टीम राजस्थान रॉयल्सची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे. संजू राजस्थानची साथ सोडण्यासाठी इच्छूक असल्याचा दावा केला जात आहे. अशातच संजू आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात असणार हे निश्चित समजलं जात आहे. ऋषभ पंत याला दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळता येणार नसल्याचं नक्की आहे. तसेच टी 20i कॅप्टन सूर्यकुमार यादव ग्रोईन इंजरीनंतर कमबॅक करणार आहे. मात्र सूर्याला एनसीएकडून अजून ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. त्यामुळे सूर्या या स्पर्धेत खेळू शकणार की नाही? याकडेही भारतीय क्रिकेट वर्तुळाचं लक्ष असणार आहे.